Join us

तामिळ काकस्पर्श मध्ये केतकी अरविंद सोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:52 IST

केतकी माटेगावकरने शाळा, टाईमपास, काकस्पर्श, फुंतरु यासारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भुमिका साकारल्या आहेत. आता केतकी काकस्पर्श या सिनेमातून तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करीत आहे. मराठी काकस्पर्शमधील केतकीच्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दशर्विल्या नंतर आता ती हाच सिनेमा हिंदी व तामिळ मध्ये करीत आहे

            केतकी माटेगावकरने शाळा, टाईमपास, काकस्पर्श, फुंतरु यासारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भुमिका साकारल्या आहेत. आता केतकी काकस्पर्श या सिनेमातून तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करीत आहे. मराठी काकस्पर्शमधील केतकीच्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दशर्विल्या नंतर आता ती हाच सिनेमा हिंदी व तामिळ मध्ये करीत आहे. लोकमत सीएनएक्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये तीने या गोष्टीचा उलगडा केला  आहे. केतकी म्हणाली, तामिळ काकस्पर्शमध्ये मला अरविंद स्वामी यांच्याबरोबर भुमिका करायला मिळाल्याने मी खुपच खुष आहे. या चित्रपटामध्ये टिस्का चोप्रा, मिलिंद सोमण यांच्या देखील भुमिका आहेत. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण त्याच वाड्यात म्हणजे कोकणातच केले आहे. या दिग्गज मंडळींसोबत काम करताना मला खुप काही शिकता आले. तामिळ काकस्पर्श करताना मला ते डायलॉग्ज काही समजायचे नाही, मी पाठ करायचे आणि म्हणायचे. परंतू मी अभिनयावर जास्त जोर देत स्वत:ला अभिनयातून साकारण्याचा प्रयत्न केला अन त्या भुमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. काहीच महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. आता केतकीचा तामिळ अभिनय तिच्या चाहत्यांना कितपत ावडतोय ते पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे एवढे मात्र नक्की.