Join us  

"शेवटी अश्रू आणले तुम्ही...", 'जुनं फर्निचर' सिनेमा पाहिल्यानंतर आजोबांची महेश मांजरेकरांना प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 2:57 PM

महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' सिनेमा पाहिल्यानंतर आजोबा भावुक, म्हणाले...

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर जुनं फर्निचर हा नवा कोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमातून एका वृद्ध झालेल्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट मांडण्यात आली आहे. स्वत:च्याच लेकाविरोधात कोर्टात जाणाऱ्या आणि इंगा दाखवत लेकाला वठणीवर आणणाऱ्या वृद्ध वडिलांभोवती या सिनेमाची कथा फिरते. २६ एप्रिल शुक्रवारी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ट्रेलरपासून या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. 'जुनं फर्निचर' पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर एका आजोबांनी महेश मांजरेकरांना प्रतिक्रिया दिली आहे. 'जुनं फर्निचर' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा थिएटरमधील व्हिडिओ समोर आला आहे. सिनेमा पाहून आजोबा भावुक झाल्याचं दिसत आहे. सिनेमा संपल्यानंतर ते महेश मांजरेकरांना "शेवटी अश्रू आणले तुम्ही...", असं म्हणताना दिसत आहेत. मराठी स्क्रीन या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

'जुनं फर्निचर' सिनेमात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शनही महेश मांजरेकर यांनीच केलं आहे. 

टॅग्स :महेश मांजरेकर मराठी अभिनेतासिनेमा