Join us  

Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’मधील ‘भावी आमदार’ जोमात, पार केला ३ मिलियन व्ह्यूजचा टप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 6:42 PM

Jaggu Ani Juliet : अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांचा आगामी चित्रपट जग्गू आणि ज्युलिएट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचा आगामी चित्रपट जग्गू आणि ज्युलिएट (Jaggu Ani Juliet) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची घोषणा झाली, त्या दिवसापासूनच हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. तसेच हा चित्रपट अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असल्याने यातील गाणीही लोकप्रिय होत आहेत. अशातच यातील नुकतंच रिलीज झालेलं आणि श्रीवल्ली फेम सिड श्रीरामने गायलेलं ‘कधी न तुला’ हे गाणं युट्युबवर तेराव्या क्रमांकाला ट्रेंडिंग होत आहे. हे गाणं रिलीज झाल्याच्या काही क्षणातच भन्नाट व्हायरल झालं. तर याच चित्रपटातील ‘भावी आमदार’ या गाण्याने तब्बल ३ मिलियन व्हयूजचा टप्पा पार केला आहे.

‘कधी न तुला’ या गाण्यात जग्गू आणु जुलिएटला प्रेमाची जाणीव होऊन त्या प्रेमाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची ओढ लागली आहे असं दिसतंय. एक हळुवार भावनेची गोष्ट सांगणारं हे गाणं आहे. अशातच या गण्याला सिडचा आवाज, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि अजय-अतुल यांचं रमणीय संगीत यांमुळे चार चाँद लागले आहेत. तसेच या गाण्यात या दोघांसबत वाहणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाणारी आहेत. या सगळ्या जमून आलेल्या समीकरणामुळेच हे गाणं सध्या जोरदार ट्रेंड होतंय. 

तर ‘जग्गू आणि जुलिएट’मधील ‘भावी आमदार’ हे सगळ्यांनाच थिरकायला लावणारं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेलं दिसतंय. या गाण्याला युट्यूबवर तब्बल ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात उपेंद्र लिमये, अमेय वाघ, जयवंत वाडकर यांच्या सोबत सगळा कोळीवाडा नाचताना दिसतोय. अजय-अतुलच्या अफाट शब्दांमुळे आणि संगीतामुळे हे गाणं लोकप्रिय होतंय. तर अतुल यांच्या आवाजाने गाण्याला चाँद लावलेत. मराठी गाणी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात बघितली जाणं मराठी रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपट १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :अमेय वाघवैदेही परशुरामी