Join us  

Jaggu Ani Juliet : 'जग्गू अँड ज्युलिएट' प्रदर्शित, अमेय वाघ म्हणतो, 'लाडक्या मराठी प्रेक्षकांवर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:06 AM

गेल्या काही दिवसांपासून 'जग्गू आणि ज्युलिएट' म्हणजेच आपले अमेय आणि वैदेही  प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Jaggu Ani Juliet : मराठी चित्रपटांना सध्या अच्छे दिन आले आहेत. 'वेड' आणि 'वाळवी'ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) चा 'जग्गू अँड ज्युलिएट' सिनेमा आजपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याआधी ही जोडी 'झोंबिवली' सिनेमात बघायला मिळाली होती. 'जग्गू आणि ज्यूलिएट'ला देखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा अशी साद अमेयने घातली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'जग्गू आणि ज्युलिएट' म्हणजेच आपले अमेय आणि वैदेही  प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन ते सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर तर चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. आजपासून सिनेमा प्रदर्शित झाला असून अमेयने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मराठी प्रेक्षकांना आवाहन केले आहे. अमेय लिहितो, 'आजपासून “जग्गु आणि Juliet” तुमचे झाले ! मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर, मराठी सिनेमावर प्रेम करणाऱ्या आपल्या लाडक्या मराठी प्रेक्षकांवर आमचा विश्वास आहे! नक्की बघा!'

कालच  'जग्गू अँड ज्युलिएट'चे स्पेशल स्क्रीनिंग पार पडले. मराठी कलाकारांनी स्क्रीनिंगला हजेरी लावली. सोबतच सिनेमाला तसेच अमेय आणि वैदेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या.

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची घोषणा झाली, त्या दिवसापासूनच हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. तसेच हा चित्रपट अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असल्याने यातील गाणीही लोकप्रिय होत आहेत. अशातच यातील नुकतंच रिलीज झालेलं आणि श्रीवल्ली फेम सिड श्रीरामने गायलेलं ‘कधी न तुला’ हे गाणं युट्युबवर तेराव्या क्रमांकाला ट्रेंडिंग होत आहे. हे गाणं रिलीज झाल्याच्या काही क्षणातच भन्नाट व्हायरल झालं. तर याच चित्रपटातील ‘भावी आमदार’ या गाण्याने तब्बल ३ मिलियन व्हयूजचा टप्पा पार केला आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटअमेय वाघवैदेही परशुरामीमराठी अभिनेतासोशल मीडिया