Join us  

'शिक्षणाच्या आयचा घो' चित्रपटातील या चिमुरडीला आता ओळखणं झालंय कठीण, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 7:00 AM

'शिक्षणाच्या आयचा घो' चित्रपटातील बालकलाकार आता मोठे झाले असून त्यांना ओळखणं कठीण झाले आहे.

२०१० साली शिक्षणावर आधारीत सुपरहिट झालेला चित्रपट म्हणजे शिक्षणाच्या आयचा घो. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला आणि या चित्रपटातील पात्रांनाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सचिन खेडेकर, भारत जाधव, साक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील दोन बालकलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हे बालकलाकार म्हणजे गौरी वैद्य आणि सक्षम कुलकर्णी. आता हे बालकलाकार मोठे झाले आहेत आणि त्यांचे लूकही. गौरी वैद्यने शिक्षणाच्या आयचा घो चित्रपटात दुर्गाची भूमिका साकारली होती. 

शिक्षणाच्या आयचा घो चित्रपटाची कथा श्रीनिवास राणे याच्या भोवती फिरते. तो सरासरी विद्यार्थी आहे. तो सरासरी शैक्षणिक बुद्धिमत्तेने जन्माला येतो, मात्र जेव्हा क्रिकेटचा विचार केला तर तो जन्मजात अलौकिक बुद्धिमत्ता आहे. मात्र वडिलांना त्याने क्रिकेट न खेळता अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे मत असते. अभ्यासात रस नसलेला श्रीनिवास हा दबाव हाताळू शकत नाहीत आणि हे त्याचे वडील आणि मुलाचे नाते बिघडवण्याच्या मानसिकतेवर प्रतिबिंबित करते, ज्यावर रागाच्या भरात वडील असे काहीतरी करतात ज्यामुळे त्याला पश्चात्ताप करावा लागतो. यावर आधारीत या चित्रपटाची कथा आहे. खूप छान संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.

या चित्रपटात श्रीनिवाससोबत दुर्गाची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी वैद्य हिने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ही गौरी खूप मोठी झाली असून तिला ओळखणे कठीण झाले आहे. 

गौरी आता २६ वर्षांची झाली आहे. तिने मुंबईतील माटुंगा येथील ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली आहे.

आपले शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयापासून लांब गेली. तिचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. मात्र ती लवकरच रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. कारण 'दे धक्का' चित्रपटाचा सिक्वेल रसिकांच्या भेटीला येतोय. यांत गौरीची भूमिका असण्याची शक्यता आहे.

'शिक्षणाच्या आयचो घो' या चित्रपटाशिवाय गौरी आणि सक्षमने दे धक्का या चित्रपटात एकत्र काम केले होते. २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ या रियालिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत भाग घेतला होता.

२०१५ साली तिने आवाहन चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :भरत जाधवमहेश मांजरेकर