Join us  

Exclusive : सोज्वळ ईशा उर्फ गायत्री दातार 'कोल्हापूर डायरिज'मध्ये करणार ही गोष्ट, वाचल्यावर तुम्ही म्हणाल अरे बापरे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 7:00 PM

गायत्री दातार आता लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील विक्रांत सरंजामे व ईशा दातार या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. विक्रांत सरंजामेची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारतो आहे तर ईशाची भूमिका अभिनेत्री गायत्री दातार करते आहे. गायत्रीची ही पहिलीच मालिका आहे. आता लवकरच ती कोल्हापूर डायरिज चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. मालिकेत सोज्वळ, साधी व सालस आणि सर्वांना गुणी वाटणारी ईशा सिनेमात मात्र वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री गायत्री दातार 'कोल्हापूर डायरिज'मध्ये मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात ती किसिंग सीन करताना दिसणार असल्याचेही समजते आहे. अद्याप याबद्दल कोणताही खुलासा तिच्याकडून किंवा चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आलेला नाही. 

या चित्रपटाबद्दल गायत्री दातारने मराठी बॉक्स ऑफिस या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''कोल्हापूर डायरीज' या चित्रपटामध्ये मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मुलीचे पात्र साकारले आहे. ती इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. आता मालिकेतील माझी भूमिका पाहता सगळे मला ईशा म्हणून ओळखतात पण चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षक मला अगदीच वेगळ्या भूमिकेत पाहणार आहेत. मालिकेतील ईशा जशी साधी आहे तसे चित्रपटातील माझी भूमिका त्याविरुद्ध असणार आहे.'

'कोल्हापूर डायरिज' चित्रपटात गायत्री दातारसोबत भूषण नानासाहेब पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे. तर संगीतकार अवधूत गुप्ते या चित्रपटाचा सादरकर्ता आहे.

हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गायत्रीला बोल्ड अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :गायत्री दातारतुला पाहते रे