चलनबंदी : मराठी नाटक, मालिका आणि सिनेउद्योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 18:14 IST
- निरंजन विद्यासागर आज चलनबंदीचा एतिहासिक निर्णय जाहीर झाल्याचा एक महिना पूर्ण झाला. अन्न वस्त्र, निवारा, आणि एकविसाव्या शतकात ...
चलनबंदी : मराठी नाटक, मालिका आणि सिनेउद्योग
- निरंजन विद्यासागर आज चलनबंदीचा एतिहासिक निर्णय जाहीर झाल्याचा एक महिना पूर्ण झाला. अन्न वस्त्र, निवारा, आणि एकविसाव्या शतकात मनोरंजन या मानसांच्या मूलभूत गरजा झाल्या आहेत. अस म्हटंल तर फार वावगे ठरू नये. अर्थात इतर उद्योगधंद्यांप्रमाणे ‘मनोरंजन’ म्हणावा तसा मान आणि सरकार दरबारी दर्जा अजिबात नाही. शेत्कºयांचे प्रश्न, बंद पडणारे उद्योग, आयटी मुळे येणारे परकीय चलन असं कुठलही टीआरपी देणार हे क्षेत्र नसल्यामुळे माध्यमामचे देखील इकडे फारसं लक्ष नसतं. त्यातून नट, निर्माते, म्हणजे काळ्या पैशांत लोळणारे आणि काळे धंदे करणारे असा गैरसज असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्याव आणि त्यांच्या समस्या सोडवाव्या अस कोणालाही वाटत नाही. पण त्याबरोबर अनंत तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, लाईटमॅन आणि पडद्यामागील कलाकार अक्षरश: २४ ७ ७ राबत असतात, या चलनबंदीमुळे या सगळ्यांवर झालेल्या परिणामांचा हा धांडोळा. सुरुवात करुया, नाट्यसृष्टीने - मराठी नाटक महाराष्ट्राला नाटकाची परंपरा वगैरे आहे असं म्हणतात, पण वर्षानुवर्ष नाट्यगृहांची झालेली अधोगती, टीव्ही आणि सिनेसृष्टीच्या उदयानी झालेली कलाकार गळती अशा अनेक समस्यांनी नाट्यव्यवसाय ग्रासला आहे. त्यातून इथे सगळा व्यवसाय रोखीचा. त्यामुळे चलनबंदीचा नाटकांना सर्वांत जास्त फटका बसला. ठरलेले प्रयोग रद्द करणे, ८-१० प्रेक्षकांसमोर प्रयोग सादर करणे. असे अनेक प्रयोग गेल्या महिन्यात झाले, कलाकारांचे तारकांचे गणित जे अनेक दिवस आधीच ठरलेले असते. त्यामुळे त्यांना प्रयोगातून येणाºया उत्पन्नावर पाणी सोडायला लागले. कुठलेही इतर उत्पनानचे साधन नसलेल्या आणि हातावर पोट असलेल्या पड्यामागील कलाकारांची खायची भ्रांत झाली आणि चलनटंचाईमुळे तिकीट न खपल्याने निर्माते प्रयोग रद्द करू लागले. पण मग यापूर्वीच आपल्या लाडक्या पंतप्रधांनामी ‘डिजीटल इंडिया’च्या हाकेला उत्तर म्हणून या निर्मात्यांनी आॅनलाईन बुकिंग हा पर्याय स्वीकारला नाही? या प्रश्नावर नाट्यनिर्माते अजित भूरे यांची ही प्रतिक्रिया‘‘मराठी निर्मात्यांनी नेहमीच प्रेक्षकांचा विचार केला आहे. आॅनलाईन तिकिटे विकत घेताना प्रत्येक तिकिटामागे १० टक्के रक्कम जास्त द्यावी लागते हे आम्हलाही आवडत नाही, पण सध्याची चलन टंचाईची परिस्थिती पाहता हा पर्याय स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. तसेच नाटकाचा हा व्यवसाय हा तुटपुंज्या नफ्यात (बºयाच वेळा तोट्यातच) चालणारा आहे. आॅनलाईन किंवा कार्ड पेमेंटचा पर्याय स्वीकारताना निर्मात्यांनी प्रत्येक तिकीटामागे किमान २ टक्के रक्कम अदा करावी लागते. हा भार सध्यातरी पेलावा लागेल’’. एकूणच लादला गेलेला ‘आॅनलाईन बुकिंग’चा पर्याय खर्चात कपात, कमी प्रयोग आणि सध्या नवीन निर्मिती न करणे अशी नाट्यव्यवसायाची अवस्था आहे. आता वळूया मालिकांकडेटीव्ही मालिकांचे निर्माते हे वाहिन्यांवर अवलंबून असतात आणि वाहिन्या जाहिरात उत्पन्नावर. निर्माता आणि पर्यायानी कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मिती प्रक्रियेतील इतर घटक, हे ९० दिवसाच्या उधारीवर काम करतात. त्यामुळे या चलनबंदी आणि चलनटंचाईचा कुठलाही फटका त्यांना बसायची शक्यता नाही. पण जाहिरात क्षेत्रातील एका वरिष्ठ व्यवसायिकांनी असा अंदाज व्यक्त केला की, येणाºया सांभाव्य मंदीचा सामना करायला जाहिरात खर्चावर कात्री चालवावी लागेल. टीव्ही उद्योगाला किमान १५०० कोटीचा फटका पुढील तीन महिन्यात बसेल. याचा थेट परिणाम नवीन मालिकांच्या निर्मिती आणि चालू मालिकांमध्ये खर्च कपात असा होईल. म्हणजेच टीव्ही उद्योगावर एका छोट्या मंदीचे सावट घोंगावू लागलं आहे. आता या साखळीतल्या सगळ्यात छोट्या म्हणजे तंत्रज्ञ, स्पॉटबॉय यांच्यावर झालेल्या परिणामाचा आढावा घेऊया. ही मंडळी २४ ७ ७ गुरांसारखी राबतात असं म्हटंल तर वावगं ठरू नये. डोबिवली, अंबरनाथ, अशा मुंबईच्या उपनगरातून मढ, मीर रोड, नायगाव अशा ठिकाणी सकाळी ७ ला पोहचावं लागतं. महिन्यात हक्काची २ दिवसाची सुट्टी अशा परिस्थितीत स्वत:च्या हक्काचा पैसा बदलायला जायला देखील त्यांना वेळ नाही. मराठी सिनेसृष्टीला गेल्या ७ -८ वर्षांत ‘अच्छे दिन’ आले. गेल्या ५ वर्षांत दरवर्षी १०० ते १२५ चित्रपटांची निर्मिती आहे, ही खरतर भरभराट नसून आलेली सूज आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर अश्या ठिकाणी जन्मला आलेले गुंठासम्राट, भ्रष्ट सरकारी अधिकारी यांनी जमिनी, सोनं यात काळापैसा रिचविला आणि मग समाजात प्रतिष्ठापद प्राप्त करण्यासाठी चित्रपट निर्मितीकडे मोर्चा वळविला. त्यांच्या बुद्धी आणि कुवतीनुसार निर्माण झालेले चित्रपट चालण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे एकूणात २-३% चित्रपटांनी यशची चव चाखली. अनेक नवोदित लेखकांना दिग्दर्शकांना किमान प्रयोग करून चुका माफ करून बघण्याची संधी मिळाली. यातून काही जणांनी केलेल्या चुकांतून शिकून पुढे उत्तम चित्रपट निर्माण केले. २-३ % सक्सेस रेट असलेल्या कर्ज अथवा इतर कुठलेही आर्थिक पाठबळ नसलेल्या या उद्योगाला काळ्या पैशावर अबलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. या चलनबंदीमुळे अनेक चित्रपट एका रात्रीत बंद पडले. त्यावर अवलंबून असलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांवर घरी बसायची वेळ आली. मुळात काळ्या पैशावर अवलंबून असलेला असा व्यवसाय करावा का हा लेखाचा विषय नाही, पण कुबड्या धरून चालणाºया या उद्योगाला इतर कुठलाही पर्याय उपलब्ध करून न देता सरकारनी एका रात्रीत कुबड्या काढून घेऊन सगळ्यांना अक्षरक्ष: तोडांवर पाडले. शहरी पांढरपेशी, काळ्या पैशा विषयी परंपरागत समजूती असलेल्या वाचकांना या भ्रमातील सद्य आणि खºया परिस्थिती विषयी जाणीव करून देणे यासाठी हा ऊहापोह. बाक ी अन्न, वस्त्र, निवारा आणि मनोरंजन ह्या मानसाच्या गरजा आहेत. ह्या भाबड्या विचारावर श्रद्धा ठेऊन हा कठीण कालखंड पार करण्याचा प्रयत्न करणं आणि ही परिस्थिती लवकरात लवकर निवळेल ह्या आशेवर जगणं एवढेच हाती आहे.