मराठी चित्रपटांसाठी २०१६ हे वर्ष कसे ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 17:56 IST
मराठी चित्रपटसृष्ट्रीत २०१६ हे वर्षे खूपच खास ठरले असल्याचे पाहायला मिळते. यावर्षी अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्सआॅफीसवर चांगले यश मिळविले ...
मराठी चित्रपटांसाठी २०१६ हे वर्ष कसे ठरलं
मराठी चित्रपटसृष्ट्रीत २०१६ हे वर्षे खूपच खास ठरले असल्याचे पाहायला मिळते. यावर्षी अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्सआॅफीसवर चांगले यश मिळविले असल्याचे पाहायला मिळत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सैराट या चित्रपटाने तर बॉक्सआॅफीसवरचे सर्व रेकॉर्डच तोडले असल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यत मजल मारली. तसेच बॉलीवूडमध्यदेखील या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच या चित्रपटाचे यश पाहता थेट बॉलीवूडमध्येच या चित्रपटाचा रिमेक येणार आहे. हा चित्रपट बॉलीवूडचा तगडा दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. तसेच महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या चित्रपटानेदेखील करोडोंचा टप्पा पार केला. अशा या यशस्वी मराठी चित्रपटांच्या या यशाबाबत कलाकारमंडळी एकत्रित येऊन हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी कसे गेले यावर चर्चा करण्यात आली. अदभूत' या यू ट्यूब चॅनलवर 'पॉपकॉर्न पे महाचर्चा' या कार्यक्रमात यावेळी अनेक दिग्गज एकत्र पाहायला मिळाले. या चर्चेमध्ये महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी ही दिग्गज मंडळींनी या यशावर प्रकाश टाकला. २०१६ सालात प्रेक्षकांसमोर आलेल्या अनेक चित्रपटांबद्दल गप्पा मारताना या व्हिडिओत दिसत आहेत. नटसम्राट आणि सैराट हे दोन २०१६ या वर्षातले उल्लेखनीय चित्रपट या विषयांवर चर्चा झाली. या निमित्तानंच मराठी चित्रपटांशी भावनेनं जोडला गेलेला मराठी माणूस, मराठी चित्रपटांकडून सगळ्याच प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि मराठी चित्रपटांचा बिझनेस या विषयांवरही चर्चा झाली... या निमित्तानं २०१६ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी कसं ठरलं, असं या दिग्गजांना वाटतंय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल...