किशोरी शहाणे झळकणार हिंदी मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 15:29 IST
किशोरी शहाणे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या होत्या. आज ...
किशोरी शहाणे झळकणार हिंदी मालिकेत
किशोरी शहाणे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या होत्या. आज अनेक वर्षांनंतरही त्यांनी आपले प्रस्थ कायम ठेवले आहे. हृतिक रोशनच्या मोहेंजोधारो या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. आता त्या पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यश राज फिल्मचा लम्हे हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अनिल कपूर, श्रीदेवी, अनुपम खेर, वहिदा रहमान या सगळ्याच कलाकारांनी या चित्रपटात खूप चांगले काम केले होते. या चित्रपटावर आधारित एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत किशोरी शहाणे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. किशोरी शहाणे या मालिकेत परमीत सेठीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. परमीतने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मालिकेतील त्याची भूमिका तर प्रचंड गाजली होती. अभिनयात यश मिळाल्यानंतर परमीत गेल्या काही वर्षांपूर्वी दिग्दर्शनकडे वळला. दिग्दर्शनात व्यग्र असल्यामुळे तो सध्या अभिनयापासून दूर आहे. तो हर मर्द का दर्द या मालिकेचे दिग्दर्शन करत आहे. या मालिकेत एक आगळीवेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तो या मालिकेद्वारे कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणार आहे.परमीत सेठी आणि किशोरी शहाणे यांच्यासोबतच या मालिकेत तेजस्वी प्रकाश आणि अफान खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तेजस्वीने स्वरांगी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच जितेन लालवानी, अंजली गुप्ता यांच्यादेखील या मालिकेत भूमिका असल्याची चर्चा आहे.