Join us  

"बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या"; म्हणणाऱ्या हेमंतला पत्नी क्षितीचं उत्तर! म्हणाली, "दादा म्हणून हट्ट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 2:19 PM

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी सोशल मीडियावर एकमेकांशी साधलेला संवाद चांगलाच व्हायरल झालाय (hemant dhome, kshitee jog)

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल. क्षिती - हेमंत यांनी विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. क्षितीने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधून बॉलिवूडमध्येही छाप पाडली. तर हेमंतने 'झिम्मा 2' च्या माध्यमातून सर्वांच्या मनावर राज्य केलं. हेमंत - क्षिती या नवरा बायकोचा एक मजेशीर संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

झालं असं की.. हेमंतने एक फोटो पोस्ट केलाय. डोळ्यांवर गॉगल, कपाळावर टिळा अशा रांगड्या अवतारात हेमंतने फोटो पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करुन हेमंतने कॅप्शन लिहिलंय की, "नाही नाही म्हणत बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या! आपण कसं दिलवाला व्हायचं, बाकी होतंय की मग आपोआप!". यावर हेमंतची पत्नी क्षितीने त्याला भन्नाट रिप्लाय दिलाय. 

क्षितीने हेमंतच्या फोटोवर रिप्लाय देताना लिहिलं की, "आता भावाकडून मागण्या नाही करणार पोरी तर कोणाकडे करणार. दादा म्हणून हट्ट पुरवायचे बहिणींचे." क्षितीने असा रिप्लाय करुन हेमंतची बोलती बंद केली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हेमंत सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काहीच दिवसांपुर्वी हेमंतने आगामी सिनेमाच्या ऑडिशनची पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेली.

टॅग्स :मराठीमराठी अभिनेता