Join us  

तिथं दीपवीर,विरुष्का रोमँटीक सेल्फी काढतायेत, हेमांगी कवी पतीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली......

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 2:55 PM

बॉलिवूडचे ट्रेडिंग कपल म्हणून ओळखले जाणारे दीपवीर म्हणजेच दीपिका आणि रणवीर, विरुष्का म्हणजे विराट आणि अनुष्का या कपलल्सना लॉकडाऊनमुळे एकमेकांसह वेळ देता येणं शक्य झाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. वैविध्यपूर्ण  भूमिकांमधून हेमांगीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.हेमांगी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावरही ती आपले फोटो आणि विचार शेअर करत असते. लॉकडाऊनमध्येही हेमांगी चाहत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करत असते. मजेशीर विनोदी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.   

लॉकडाऊनमध्ये सारेच घरात बंदिस्त झाले आहेत. लॉकडाऊनमध्येही घरात बंदिस्त असले तरीही  सेलिब्रेटी वेगवेगळ्या गोष्टी करत स्वतःला बिझी ठेवत आहेत. बॉलिवूडचे ट्रेडिंग कपल म्हणून ओळखले जाणारे दीपवीर म्हणजेच दीपिका आणि रणवीर, विरुष्का म्हणजे विराट आणि अनुष्का या कपलल्सना लॉकडाऊनमुळे एकमेकांसह वेळ देता येणं शक्य झाले. एरव्ही शूटिंगमध्ये बिझी असलेल्या कलाकारांना असेही वेळ देणे जमत नाही त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान हे कपल रोमँटीक टाइम एन्जॉय करताना दिसतात. 

या दोन्ही बॉलिवूड कपलला टक्कर देईल असा वेळ सध्या लॉकडाऊनमध्ये मराठमोठी अभिनेत्री हेमांगी कवी एन्जॉय करताना दिसत आहे. पतीची सेवा करतानाचा एक फोटो तिने चाहत्यांसह शेअर केला आहे. हेमांगीने या फोटोला मजेशीर अशी कॅप्शनही दिली आहे. या फोटोला हेमांगीने दिलेली कॅप्शन लक्षवेधी आहे.

फोटो पोस्ट करत तिने लिहीलंय की,तिथं दिपविर, विरुष्का क्वॉरंटाईन काळात लय रोमांचिक सेल्फ्या पोष्टीत हायेत, मंग म्हणलं इथं आमी पन काय कमी नाय ! इस बंद कमरे में पतीदेव का कॅमेरा....हे ते कमरा... हे आपलं ते कमर दबा रहें हैं हम ! तो फिर क्या गम, तो फिर क्या गम ! हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी देखील अतिशय मेजशीर अंदाजात आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

टॅग्स :हेमांगी कवीदीप- वीर