Join us  

 ‘हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा’;  प्रियंका गांधींचा ‘तो’ फोटो पाहून अभिनेत्री हेमांगी कवी भडकली

By रूपाली मुधोळकर | Published: October 04, 2020 6:08 PM

आहे का सुरक्षित? कसे वाटतायत ते हात तिच्यावर?

ठळक मुद्देप्रियंका गांधी यांना पोलिसांनी दिलेल्या या असभ्य वागणुकीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही टीका केली.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाललेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवर अडवून ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना ढकलून देण्यात आले.  उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने संताप व्यक्त केला होता. आता मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या असभ्य वर्तनावर संताप व्यक्त केला आहे. प्रियंका गांधींचा एक फोटो शेअर करत, तिने हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

या फोटोत एक पोलिस अधिकारी प्रियंका गांधी यांचा कुर्ता धरून ओढताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर हेमांगीने एक जळजळीत पोस्ट लिहिली आहे.‘नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम. बाहेर पडा म्हणणा-यांनो, चॅलेंज करणा-यांनो हे पाहा. आहे का सुरक्षित? कसे वाटतायत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे. मूळ समस्या कुठेय कळतंय का? असा सवाल हेमांगीने या पोस्टमधून केला आहे.

प्रियंका गांधींचा हा फोटो दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी)वर घडलेल्या घटनेचा आहे. शनिवारी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाना भेटण्यासाठी राहुल गांधी व प्रियंका गांधी हाथरसकडे निघाल्या असताना ही घटना घडली होती.प्रियंकका गांधी स्वत: गाडी चालवत डीएनडीपर्यंत पोहचल्या होत्या. त्यांच्यासोबत गाडीत राहुल गांधीही बाजुच्याच सीटवर बसले होते. काँग्रेसच्या ३५ खासदारांसह काही कार्यकर्ते त्यांच्याच मागोमाग हाथरसकडे निघाले होते. डीएनडी फ्लायओव्हरवर पोहचताच पोलिसांनी हा ताफा अडवला. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची सुरु झाली. यादरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल-प्रियंका यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. मात्र इतर कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला. यावेळी पोलिसांनी  लाठीचार्ज केला. कार्यकर्त्यांवर लाठीमार होत असलेला पाहून प्रियंका  स्वत: गाडीतून उतरल्या आणि  आपल्या कार्यकर्त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला. यावेळी काही पोलिसांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केले.

संजय राऊत यांनीही व्यक्त केला संताप

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी दिलेल्या या असभ्य वागणुकीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही टीका केली. क्या योगीजी के राज में महिला पोलिस नही है? असा सवाल त्यांनी केला.

 

टॅग्स :हेमांगी कवीप्रियंका गांधी