Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय जाधवच्या पत्नीला पाहिलंत का?, लाइमलाइटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 07:00 IST

संजय जाधवच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

दुनियादारी फेम संजय जाधवने सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता असा यशस्वी प्रवास केला आहे. सुरूवातीच्या काळात त्याने काही मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. संजय जाधवच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्याची लेक उत्तम डान्सर आहे आणि सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. तर त्याची पत्नी प्रोमिता लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

संजय जाधवच्या पत्नीचे नाव प्रोमिता असून ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. तर त्यांच्या मुलीचे नाव ध्रिती जाधव असून ती उत्तम डान्सर आहे. तिचे सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ पहायला मिळतात. तिचे बरेचसे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

तिने काही व्हिडीओ आई आणि वडिलांसोबतही बनवले आहेत. तिच्या डान्सच्या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते.

संजय जाधवने ‘सावरखेड एक गाव’,‘सातच्या आत घरात’,‘डोंबिवली फास्ट’,‘जोगवा’हे मराठी तर ‘मुंबई मेरी जान’,‘सी कंपनी’ या हिंदी चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केल्यानंतर तो मराठी सिनेमांच्या दिग्दर्शनाकडे वळला.

त्याने ‘चेकमेट’,‘रिंगा रिंगा’हे दोन सिनेमे दिग्दर्शित केले. मात्र, त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘दुनियादारी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर संजयने ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘गुरू’, ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याशिवाय ‘दुहेरी’ तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांचीही त्याने निर्मिती केली. तसेच ‘सुर सपाटा’या चित्रपटात त्याने अभिनय केला.

टॅग्स :संजय जाधव