Join us  

प्रिया बापटचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 6:00 AM

फोटोमध्ये प्रिया विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मेकअपविना असून निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात  वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिच्याकडे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.  

प्रियाने 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी सिनेमांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी सिनेमातूनही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 

अशाप्रकारे विविधांगी भूमिकांमधून प्रियाने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव्ह असून  आपल्या संपूर्ण कामाविषयीची अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते.  नुकताच प्रियाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.  फोटोमध्ये  प्रिया विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मेकअपविना असून निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा लूक तिच्या फॅन्सना ही भावला आहे. नेहमीप्रमाणे तिच्या या लूकलाही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.

टॅग्स :प्रिया बापट