Join us

हे गुटगुटीत बाळ कोण आहे ओळखा पाहू? मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये गाजवणाऱ्या अभिनेत्याचं हे बालरुप…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:16 IST

त्याच्या पहिल्याच मालिकेतील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी आणि फॅन्सशी संवाद साधत असतात. आपल्या जीवनातील घडामोडी, विविध फोटो, व्हिडिओ आणि आगामी प्रोजेक्टसची माहिती शेअर करत असतात. त्यामुळे फॅन्सना आपल्या लाडक्या कलाकाराची माहिती आणि त्यांचे कधीही न पाहिलेले रुप फोटो तसंच व्हिडिओमधून पाहायला मिळतं. नुकतंच सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील हे गुटगुटीत बाळ म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. 

छोटा पडदा, मोठा पडदा आणि वेबसिरीजमधून रसिकांच्या मनात सिद्धार्थने घर केले आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा बालपणाचा फोटो पाहून त्याचे फॅन्सही खूश झालेत. गुटगुटीत आणि चेहऱ्यावर हसू असलेला सिद्धार्थचा हा फोटो फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू आहे. सिद्धार्थने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच मालिकेतील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

त्यानंतर त्याने 'झेंडा', 'बालगंधर्व', 'सतरंगी रे', 'क्लासमेट्स', 'वजनदार' यांसारख्या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील त्याच्या 'जिवलगा' या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच त्याची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरीजही रसिकांना भावली. 

सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर या दोघांचा साखरपुडा झाला आहे. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच साखरपुड्याचे स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले होते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर