Join us

‘गुगल गर्ल’ गौरी कोढेची ‘उंच भरारी’! बालकलाकार म्हणून अभिनयात एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 20:24 IST

गौरी कोढे हिला सगळेजण गुगल गर्ल म्हणून ओळखतात. अख्खी भारतीय राज्यघटना मुखोद्गत असलेली आणि यासाठी इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, ...

गौरी कोढे हिला सगळेजण गुगल गर्ल म्हणून ओळखतात. अख्खी भारतीय राज्यघटना मुखोद्गत असलेली आणि यासाठी इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स, आशिया बुक आॅफ रेकॉर्ड गवसणी घालणारी, अद्भूत स्मरणशक्तीसाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड गौरी आणखी एका क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. हे क्षेत्र म्हणजे अभिनयाचे.  ८ जूनला राज्यातील बहुतांश चित्रपटगृहात ‘उंच भरारी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात नागपूर कन्या गौरी कोढे ही बालकलाकार म्हणून झळकणार आहे. अभिनेता भारत जाधव, अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री तेजा देवकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. शाम धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित आणि मनीष कोढे निर्मित या चित्रपटात काम करताना गौरीचा अनुभव कसा होता, हे जाणून घेण्याची संधी मिळाली. यावेळी गौरीने अनेक प्रश्नांना उत्तरे दिलीत.गौरी, तुझ्या नावावर अनेक विक्रम आहेत. जागतिक विक्रमाला तू गवसणी घातली आहेस. अभिनयाची संधी तुला कशी मिळाली? असे विचारले असता गौरी आधी जरा लाजली आणि आपला हा प्रवास कथन केला.  माझी आई एक मोटिवेशन स्पीकर आहे. लहान मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवावी, अशा अनेक गोष्टी ती सांगते. तिचे हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आई-बाबांच्या डोक्यात चित्रपटाची कल्पना आली. या चित्रपटात मीच काम करणार असेही ठरले आणि मी या चित्रपटात आले, असे गौरीने  सांगितले.भरत जाधव आणि मोहन जोशी यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव सांगशील, या प्रश्नावर गौरीची कळी खुलली. मोहन जोशी सरांसोबत माझा कुठलाही शॉट नव्हता. पण भरत जाधव सरांसोबत मात्र माझा पहिलाच शॉट होता. मी इतके घाबरले होते की, मला त्यांच्यासमोर रडू आले. पण त्यांनी मला शांतपणे समजावून सांगितले. मला त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, हे सांगायलाही ती विसरली नाही. भविष्यात तुला काय व्हायला आवडेल असे विचारले असता, मी अभिनय करेन की नाही, मला माहित नाही. सध्या तरी मी अभ्यासचं करणार, असे गौरीने अगदी निर्मळपणे सांगितले.‘उंच भरारी’ हा चित्रपट एक चिमुकली व तिचे आई-बाबा अशा एका त्रिकोणी कुटुंबाभोवती फिरणारी कौटुंबिक कथा आहे. आईबाबांनी मुलांमधील योग्य क्षमता ओळखून तिला चालना दिली तर मुले किती उंच भरारी घेऊ शकतात, असे याचे कथानक आहे.