Join us  

‘चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांच्या घराची झलक, मनात भरणारे इंटिरिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:11 PM

भारत गणेशपुरेंने म्हाडाच्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्ट्रगल करून मोठे झालेले मराठी ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक नाव म्हणजे भारत गणेशपुरे.चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून अनेक भूमिका करून भारत गणेपुरे यांनी आपले एक स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले. विविध ताकदीच्या भूमिक्या त्यांनी साकरल्या आहेत. अलीकडेच भारत गणेशपुरे यांनी म्हाडाच्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सुंदर असे घराचे इंटिरिअर पाहायला मिळत आहे. 

आजकाल घराच्या बाहेरील नेमप्लेटदेखील खूपच लक्षवेधी आणि आकर्षक ठरतात. भारत गणेशपुरेच्या घराबाहेरील नेमप्लेटदेखील अशीच लक्षवेधी आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठीत ‘भारत गणेशपुरे बे’ अशी हटके नेमप्लेट पाहायला मिळतीय. शिवाय, बक्षीसांसाठी सुंदर असे इंटिरिअर करण्यात आले आहे, जेणेकरून ट्रॉफी त्यामध्ये ठेवता येतील. घरात हॉलमध्ये सुंदर अशी खिडकी आहे. एकांतातही एकटक बाहेर पाहात राहावे वाटले, अशी खिडकी आहे. 

घरातील फ्लोअरिंग पाहून तुम्हीही असे इंटिरिअर आणि फ्लोअरिंगचा वापर करून घेऊ शकता.  आजकाल घराची उघडी खिडकी फारच कमी दिसून येते. मात्र गणेशपुरे घराची ही खिडकी पाहून घरात हवा हसतीखेळती राहण्यासाठी परफेक्ट इंटिरिअर वाटते. 

भारत गणेशपुरे हे विदर्भातील अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले आहेत. भारत गणेशपुरे यांच्या पत्नीचे नाव अर्चना गणेशपुरे आहे. त्या देखील दिसायला खूप सुंदर आहेत. भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

टॅग्स :भारत गणेशपुरेचला हवा येऊ द्यामराठी अभिनेता