महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर जिनिलिया महाराष्ट्राची सून झाली. रितेश आणि जिनिलिया हे सिनेसृष्टीतील लाडके कपल आहेत. जिनिलियाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरुन जिनिलिया चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं.
या सेशनमध्ये जिनिलियाने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. एका चाहत्याने जिनिलियाला थेट लग्नाची मागणीच घातली. "मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील का?" असं ask me सेशनमध्ये चाहत्याने जिनिलियाला विचारलं. चाहत्याच्या या प्रश्नाला जिनिलियाने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. जिनिलिया त्या चाहत्याला म्हणाली, "मी विचार केला असता पण मी सगळ्यात सुंदर पुरुषाशी लग्न केलं आहे".
दरम्यान, जिनिलिया 'ज्युनियर' या साऊथ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १८ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अलिकडेच जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती. 'तेरे नाल लव्ह हो गया', 'तुझे मेरी कसम', 'जाने तू या जाने ना' हे जिनिलियाचे गाजलेले सिनेमे. काही साऊथ सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.