Join us  

Photo: 'जोगवा' चित्रपटात अनिता दातेने साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका; तुम्ही ओळखलं का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 8:30 AM

Anita date:'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली राधिका म्हणजेच अनिता दाते 'जोगवा' या चित्रपटात झळकली आहे.

२००९ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'जोगवा' हा चित्रपट विसरणं कोणत्याही व्यक्तीसाठी शक्य नाही. राजीव पाटील दिग्दर्शित या चित्रपटाने समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं होतं. उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, विनय आपटे आणि किशोर कदम या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला. या चित्रपटातून जोगते आणि जोगतीण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटात अभिनेत्री अनिता दातेदेखील झळकली आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली राधिका म्हणजेच अनिता दाते 'जोगवा' या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिने छोटेखानी भूमिका साकारली आहे. परंतु, तिची भूमिका आजही अनेक प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.मात्र, या चित्रपटासाठी तिने जो लूक केला होता तो पाहून आजही अनेक जण तिला ओळखू शकलेले नाहीत. त्यामुळेच या चित्रपटात तिने कोणती भूमिका केली होती आणि ती कोणत्या गाण्यात झळकली होती ते पाहुयात.

'जोगवा' चित्रपटामध्ये अनिताने अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील मन रानात गेलं गं..या गाजलेल्या गाण्यात अनिता झळकली असून तिला ओळखणं कठीण आहे. या गाण्यात तिने परकल पोलकं आणि त्यावर दोन वेण्या घातल्या आहेत. 

दरम्यान, अनिताने जोगवाप्रमाणेच अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून ती तुफान लोकप्रिय झाली.  

टॅग्स :अनिता दातेमुक्ता बर्वेविनय आपटेसिनेमासेलिब्रिटी