Join us  

हे आहे देवदत्त नागेचं पहिलं प्रेम?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2017 6:05 AM

मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे  काहीही केल्या त्याचं  पहिलं लपवू शकलेला नाहीय. होय,  देवदत्तचं  पहिलं प्रेम आहे त्याची बाईक... बाईक ...

मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे  काहीही केल्या त्याचं  पहिलं लपवू शकलेला नाहीय. होय,  देवदत्तचं  पहिलं प्रेम आहे त्याची बाईक... बाईक चालवणं देवदत्त भलतंच आवडतं.. त्यानं त्याचं हे बाईकप्रेम वेळोवेळी उघड केलंय.. याचीच प्रचिती त्याचा हा फोटो पाहून तुम्हालाही येईल.सोशल मीडियावर देवदत्तने बाईकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आपल्या खास अंदाजात बाईकवरुन तो मस्त फेरफटका मारत असतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये डोक्यावर कॅप घालून रॉकिंग आणि रफ एंड टफ अंदाजात देवदत्त पाहायला मिळतोय.विशेष म्हणजे देवदत्तला त्याच्या फ्री टाईममध्ये बाईकवर फुल ऑन फिरायला आवडतं. तसेच बाईक चालवायला प्रत्येकाला आवडतं मात्र बाईक चालवताना हॅल्मेट घाला. सुरक्षिततेचे सगळे मार्ग अवलंबवा असे तो आवर्जुन सांगतो. 'जय मल्हार' मालिकेतील खंडोबा या व्यक्तिरेखेमुळे देवदत्तच्या करिय़रला एक वेगळे वळण मिळाले. या मालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी त्याने जेजुरीला जाऊन दर्शन घेतले होते. तसेच मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी देखील तो जेजुरीला दर्शनासाठी गेला होता असे त्याने सांगितले. मालिका सुरू असताना देखील तो अनेकवेळा जेजुरीला जात असे. पण तो रुमाल बांधून जात असल्याने लोकांना त्याला ओळखणे सुरुवातीला कठीण जात असे. पण काही दिवसांनंतर तो दर्शनासाठी रुमाल बांधून येतो हे लोकांना कळले होते. त्यामुळे रुमाल बांधलेला व्यक्ती दिसला की तो मीच आहे असे लोक लगेचच ओळखत असे असे तो सांगतो. या मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.