Join us

​ Exclusive सिदधार्थ उडत जाणार गुजरातला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 12:07 IST

  priyanka londheअभिनेता सिदधार्थ जाधव नेहमीच त्याच्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जातो. चित्रपट असो किंवा मालिका सिदधार्थने स्वत:च्या अभिनयाची ...

  priyanka londheअभिनेता सिदधार्थ जाधव नेहमीच त्याच्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जातो. चित्रपट असो किंवा मालिका सिदधार्थने स्वत:च्या अभिनयाची वेगळी छाप रसिक प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. सध्या तो गेला उडत या नाटकासाठी महाराष्ट्रभर दौरे करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे हे नाटक रंगमंचावर धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रात जवळपास नव्वद प्रयोग केल्यानंतर आता सिदधार्थ या नाटकाच्या निमित्ताने गुजरातला रवाना होणार आहे. गेला उडत या नाटकाचा पहिलाच प्रयोग महाराष्ट्राबाहेर होत आहे. नाटकांचे अनेक प्रयोग आता परदेशातही होऊ लागले आहेत. परंतू सिदधार्थच्या या नाटकाने महाराष्ट्राबाहेर भरारी घेण्याचे ठरविले आहे. गुजरातच्या प्रेक्षकांसाठी गेला उडत लवकरच रंगमंच गाजविण्यास येणार आहे. अहमदाबाद आणि बडोदा या दोन शहरांमध्ये सिदधार्थच्या या धमाल नाटकाचे प्रयोग होणार असल्याचे कळतेय. याविषयी सिदधार्थने लोकमत सीएनएक्सला माहिती देताना सींगितले की, आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर गेला उडतचा प्रयोग करण्यासाठी जाणार आहोत. येत्या ९, १० आणि ११ या तारखांना गुजरातमध्ये हे प्रयोग होणार आहेत. ९ तारखेला अहमदाबाद तर १० आणि ११ तारखेला बडोदयामध्ये हे प्रयोग होणार आहेत. सध्या हजार आणि पाचशेच्या नोटां बंदीमुळे नाटकावर परिणाम होईल असे आम्हाला वाटत होते. परंतू प्रेक्षकांनी या नाटकावर एवढे उदंड प्रेम केले आहे की त्यांनी नोटा बंदीत देखील गेला उडत ला हाऊसफुल्लचा प्रतिसाद दिला आहे. ज्या दिवशी हजारच्या नोटा बंद झाल्या होत्या त्या दिवशीच गेला उडतचे कलेक्शन १, ५२००० एवढे होते. त्यामुळे प्रेक्षकांचे प्रेम हे आमच्यासाठी खुप मोठे आहे असे सिदधार्थने सांगितले.