‘पारू’ बनली इव्हेंट मॅनेजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:12 IST
चित्रपटात भूमिका करताना, त्या भूमिकेला समजून घेऊन काम करावे लागते. तर गाण्यामध्ये मस्ती व धमाल असते. त्यामुळे या दोन्हीचेही ...
‘पारू’ बनली इव्हेंट मॅनेजर
चित्रपटात भूमिका करताना, त्या भूमिकेला समजून घेऊन काम करावे लागते. तर गाण्यामध्ये मस्ती व धमाल असते. त्यामुळे या दोन्हीचेही प्रेक्षक हे वेगवेगळे असल्याचे ‘मिस्टर अॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’ या मराठी चित्रपटाची अभिनेत्री तथा ‘पप्पी दे पारुला’ या गाण्याने घराघरात पोहोचलेले नाव स्मिता गोंदकर हिने सांगितले. यामध्ये ती एका मॅनेजरच्या भूमिकेत आहे.चित्रपटाच्या टीमने गुरुवारी (दि.८) ‘लोकमतला’ भेट दिली. यावेळी निर्माता मितांग भुपेंद्र रावळ, दिग्दर्शन दिनेश अनंत, अभिनेता राजेंद्र शिसतकर यांची उपस्थिती होती. स्मिता म्हणाली की, मराठी चित्रपटात काम करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. दिग्दर्शक दिनेश अनंत म्हणाला की, कॉर्पोरेट जगात काम करणाºया विवाहित जोडप्याच्या जीवनाची साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत कथा मांडणारा हा चित्रपट आहे. यामध्ये स्मिता एका इव्हेंट मॅनेजर तर ‘क्राईम पेट्रोल’ फेम राजेंद्र बँक मॅनेजरची भूमिका साकारत आहे. सुरेश वाडकर यांचे एक गाणे चित्रपटात आहे. वॉन्टेड सुखाकडे दुर्लक्ष करुन अनवॉन्टेड सुखाच्या शोधात भटकणाºया जोडप्याची ही कथा आहे. मराठी चित्रपटात हा वेगळा प्रयोग निर्माते मितांग रावळ यांनी आणला असून, येत्या २३ सप्टेंबरला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.