Join us  

‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकातून वरद चव्हाणची रंगभूमीवर एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 11:44 AM

विजय चव्हाण  त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले ...

विजय चव्हाण  त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.विजय चव्हाण यांच्या  रंगभूमीवरील मोरुची मावशी,टूरटूर,श्रीमंत दामोदर पंत  या नाटकांनी इतिहास रचला होता. .आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत विजय चव्हाण यांचा मुलगा ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करतोय.दिग्दर्शक नितीन कांबळे यांनीच ‘तुमचं आमचं सेम नसतं’ नाटकाचे लेखन आणि गीते लिहिली आहेत. या नाटकातून सिद्धार्थ पगारे, गौरी जोगळेकर, नितीन कुर्लेकर, कविता मगरे, आदित्य भालेराव, अभिजीत दुलगज आणि वरद चव्हाण हे कलाकार एकत्र आले आहेत.‘तुमचं आमचं सेम नसतं’ हे एक विनोदी नाटक असून रसिकांचे मनोरंजन करण्यात हे नाटक कितपत यशस्वी ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.वरदने ऑन ड्युटी 24 तास, धनगरवाडा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले असून '100' डेज या मालिकेतही तो झळकला होता. दिग्दर्शक नितीन कांबळे यांनीच ‘तुमचं आमचं सेम नसतं’ नाटकाचे लेखन आणि गीत लिहिली आहेत. संगीत व पार्श्वसंगीताची साथ तृप्ती चव्हाण यांनी दिली असून गायक साईराम अय्यर, तृप्ती चव्हाण, करण यांनी ती गायली आहेत. या नाटकातून सिद्धार्थ पगारे, गौरी जोगळेकर, नितीन कुर्लेकर, कविता मगरे, आदित्य भालेराव, अभिजीत दुलगज आणि वरद चव्हाण हे कलाकार एकत्र आले आहेत. नेपथ्य अशोक पालेकर व हरीश आहीर करणार असून प्रकाश योजना अनिकेत कारंजकर, नृत्य – संतोष भांगरे, निर्मिती सूत्रधार - संजय कांबळे, संगीत संयोजन- विशाल बोरुलकर, रंगभूषा- किशोर पिंगळे, पोस्टर डिझाईन – केतन कदम व वेशभूषा संजय (बापू) कांबळे अशी इतर श्रेयनामावली आहे.‘तुमचं आमचं सेम नसतं’चा शुभारंभाचा प्रयोग बुधवार १५ मार्चला सायं. ४:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार आहे.