Join us

का देतोय चिराग पाटील चाहत्यांना MONDAY MOTIVATION?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 14:50 IST

'वजनदार' फेम अभिनेता चिराग पाटील हा त्याच्या गुडलुक्स आणि अभिनय कौशल्याने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे.चिराग पाटील अभिनेत्री ...

'वजनदार' फेम अभिनेता चिराग पाटील हा त्याच्या गुडलुक्स आणि अभिनय कौशल्याने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे.चिराग पाटील अभिनेत्री काजल शर्मासह ‘लव बेटिंग’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असूनही तो त्याच्या फिटनेसकडे  दुर्लक्ष करत नाहीय,त्याच्या फिटनेसवर देखील तितकाच लक्ष देतोय. गेले काही दिवस चिराग फेसबुकवर त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्या वेगवेगळ्या वर्कआउट्सचे व्हिडिओज शेअर करत असतो. त्या व्हिडिओमध्ये चिराग कुठल्याही जिम इक्विपमेंट्सचा वापर  न  करता व्यायाम करतो, चिराग नुसतेच वर्कआऊटचे व्हिडिओज शेअर करत नाही तर त्याच्या चाहत्यांना वर्कआऊट करण्यासाठी मोटिवेट सुद्धा करतोय. चिरागने व्हिडिओ सोबत असा संदेश दिला आहे जर तुम्ही सकारात्मक आहात आणि कधीच हार मानणार नसाल तर कोणी तुम्हाला अडवू शकत नाही.चिरागचे हे  मोटीव्हेशन चाहत्यांना नक्कीच उत्साहित करणार ठरेल यांत काही शंकाच नाही.काही दिवसांपूर्वीच ‘लव बेटिंग’ सिनेमाचे शूटिंग हिमालयाच्या कुशीत असलेल्या, सुंदर अशा लोकेशन्सवर करण्यात आले होते.सिनेमाच्या कथेप्रमाणे इतर बाबींवरही मेहनत सिनेमाच्या टीमने घेतली आहे.‘लव बेटिंग’ या सिनेमाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन राजू मेश्राम याचं आहे. ‘प्रेम’ या संवेदनशील विषयातील चढ-उतार, या सिनेमात पहायला मिळतील. चित्रपटाची कथा-पटकथा व संवाद दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी लिहिले आहेत. कौतुक शिरोडकर, राजू मेश्राम लिखित यातील गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली आहे. ‘लव बेटिंग’ चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करीत असून वेशभूषा पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे.