Join us

जाणून घ्या मानसी नाईक करणार आहे का लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 12:17 IST

आपल्या नृत्याने अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र सध्या प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री खूप चिंतेत असल्याचे ...

आपल्या नृत्याने अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र सध्या प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री खूप चिंतेत असल्याचे कळत आहे. कारण मानसी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या जोरदारपणे सोशलमीडियावर पसरत असल्याचे दिसत आहे. तिच्या जोडीदारदेखील कोण असणार आहे याची चर्चादेखील रंगत आहे. या वाढत्या अफवा पाहून फायनली तिने सोशलमीडियावर मी विवाहबंधनात अडकणार नसल्याचा खुलासा केला आहे. तिने नुकतेच असे ट्विीट केले आहे. त्याचबरोबर मानसी सांगते, मी लग्न करत नसून, मला लगीन कराचयं  हे आगामी गाणे ७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा केवळ प्रमोशन फंडा आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनीदेखील आता सुटेकचा श्वास सोडला असेल हे नक्की.            मानसीचे लवकरच मला लगीन कराचयं आगामी गाणे येत आहे. तिच्या या नवीन गाण्याची चर्चा फार रंगत होती. कारण या गाण्यामध्ये तिच्यासोबत बॉलिवुडचा कॉमेडीचा बादशहा जॉनी लिव्हर आणि सिध्देश पै थिरकणार आहे. त्यामुळे या गाण्याविषयी प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता होती. आता मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. कारण हे गाणे ७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या गाण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. सिध्देशची ही आयडिया असून त्यानेच हे गाणे दिग्दर्शन आणि कोरिओग्राफ केले आहे. तर संगीत स्वरूप भालवणकर यांनी दिले आहेत. यापूर्वी मानसीचे बाई वाडयावर या... या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. लग्न असो या पार्टी सवर् ठिकाणी हेच गाणे वाजताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या गाण्यानंतर मानसी नाईक ही मला लगीन कराचयं या गाण्यावर कल्ला करण्यास सज्ज झाली आहे.