Join us  

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, आज आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 7:00 AM

या अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान असाच एक मराठी चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचाही बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?, आम्ही तुम्हाला सांगतो की कोण आहे ही अभिनेत्री. 

ही चिमुरडी दुसरी कोणी नसून अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा हा फोटो शेअर केला आहे. खरेतर तिने तिच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने भावासोबतचा बालपणीचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, हॅप्पी बर्थडे माझा प्रिय दादा. वय फक्त मोठे होतेय आपण नाही. मुक्ता बर्वेच्या या फोटोवर फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रेटींनीदेखील कमेंट केली आहे. 

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या मीराच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. मुक्ता बर्वेने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपला ठसा उमटविला आहे.  आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट हिट ठरले.

टॅग्स :मुक्ता बर्वे