Join us

आईच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, स्वत: केला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:45 IST

एका मुलाखती दरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

शीर कोरमा सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सिनेमाची कथा दोन मुस्लिम मुलींच्या समलैंगिक नात्यावर आधारित आहे. दिव्या दत्त आणि स्वरा भास्कर यात मुख्य भूमिका साकारणार आहेत. सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्यानंतर याला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होण्यास कदाचित वेळ लागू शकतो.  

आजतकच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान दिव्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. ती म्हणाली, आईच्या निधनानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी माझ्या आईच्या खूप जवळ होते. वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईने मला आणि माझ्या भावाला एकटीने वाढवले. तिने यासाठी खूप कष्ट घेतले होते. ती गेली हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. 

 या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे. शीर कोरमा सिनेमाबाबत बोलताना  दिव्या म्हणाली होती की, माझ्यासाठी हा फक्त चित्रपट नाही. एक महिला जिचे कुटुंब, तिचा पार्टनरसोबतच्या नात्याची कथा रेखाटण्यात आली आहे. समाजातील विचारांबद्दल बोलण्याची गरज आहे.मी एक कलाकार म्हणून चॅलेंज देण्यासाठी या भूमिकेला होकार दिला आहे आणि दुसरी बाजूदेखील मला जाणून घ्यायची होती.