Join us  

ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे? साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 10:20 AM

Mumbai Rape Case: साकीनाका प्रकरणाच्या निमित्तानं मुंबई पोलिसांनी कुणी बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना देशाच्या आर्थिक राजधानीत घडली आहे. 

मुंबईतील साकीनाका येथे झालेल्या बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतिशय अमानुषपणं पीडितेवर अत्याचार झाला (Mumbai Rape Case) होता. या घटनेवर प्रसिद्ध दिग्दर्शक,लेखक व निर्माते केदार शिंदे (Kedar Shindde)यांनी फेसबुक पोस्टवर आपला संताप व्यक्त केला आहे. विशेषत: या घटनेबद्दल निषेधाचा चक्कार शब्द न काढणा-यांबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘एक चक्कार शब्द निषेधाचा नाही. कुठे काही झालं तर लगेच कँडल मार्च काढणारे ते सो कॉल्ड प्रतिष्ठित आहेत कुठे? त्यात या मुंबईत बक्कळ पैसा कमावणारे बॉलिवूडवाले आहेत कुठे? त्यांना डोक्यावर मिरवणारे सत्ताधारी विरोधक सगळेच त्याविषयीगप्प? सगळे एका माळेचे मणी,’ अशा शब्दांत केदार शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

याचवेळी साकीनाका प्रकरणाच्या निमित्तानं मुंबई पोलिसांनी कुणी बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे.‘मला मुंबई पोलिसांविषयी प्रचंड आदर आणि अभिमान आहे. पण या काही वर्षात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम राजकीयदृष्टीने होतंय. साकीनाका प्रकरण भयंकर आहे. यात मुंबई पोलिसांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. इतकी वर्षे मी मुंबईत त्यांच्या जीवावर राहतोय,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला होता. एका मुलीसोबत चालत्या बसमध्ये घडलेला बलात्कार आणि त्यानंतर नराधमांनी तिची केलेली अवस्था पाहून संपूर्ण देश हळहळला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना देशाच्या आर्थिक राजधानीत घडली आहे. साकीनाका येथे असलेल्या खैरानी रोड परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर आरोपीनं तिच्या गुप्तांगात रॉड घातला. गंभीर अवस्थेत तिला रूग्णालयात भरती करण्यात आलं. तथापि उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य करणाºया नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :केदार शिंदेसाकीनाका