Join us

दिपाली सैय्यदने कोणाचे मानले आभार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 17:28 IST

प्रत्येक व्यक्ती ही सुंदर दिसण्यासाठी कठोर प्रयत्न करत असते. एवढेच काय आपले सौंदर्य हे उजळून दिसावे म्हणून प्रत्येकजण मेकअपविषयीदेखील ...

प्रत्येक व्यक्ती ही सुंदर दिसण्यासाठी कठोर प्रयत्न करत असते. एवढेच काय आपले सौंदर्य हे उजळून दिसावे म्हणून प्रत्येकजण मेकअपविषयीदेखील फार जागृत असल्याचे पाहायला मिळत असते. या सौदर्याच्याबाबतीत तर कलाकार अधिक जागृत असल्याचे पाहायला मिळतात. सौदर्य, फिटनेस या सर्व गोष्टी त्याच्या कामाचा भागच असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फीट व सुंदर राहणे खूपच महत्वाचे असते. त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराच्या सौदर्यला चार चाँद लावण्याचे काम मेकअप मॅन करत असतात. त्यामुळे कलाकारांना मेकअपमॅनविषयी एक आपुलकीची भावना असते. या आपुलकेपोटीच नुकतेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री दिपाली सैय्यद हिने नुकतेच आपल्या मेकअप आर्टिस्टसोबतचा एक फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर तिने मला सुंदर ठेवण्याचे काम ही सरिता करते. त्यामुळे तिचे मनापासून आभार मानत असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिपालीने नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच तिने काही मराठी रियालिटी शोच्या परिक्षणाची जबाबदारीदेखील पार पाडताना पाहायला मिळाली. तसेच तिने जत्रा या चित्रपटातीस ये ग ये... ये मैना, पिंजरा बनाया सोनेका या गाण्यावर अफलातून नृत्य करताना प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या गाण्यात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरीदेखील दिसला आहे. दिपालीचे हे गाणे आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने बंदिनी, दुर्वा या मालिकेतूनदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचप्रमाणे दिपालीची ठसकेबाज लावणी पाहण्यासदेखील प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.