Join us  

कोरोना व्हायरसचा फटका पडला 'डार्लिंग'ला, आता येणार उशीरा भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 2:27 PM

कोरोना व्हायरसचा फटका डार्लिंगला पडला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.     

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहेत. देशातही कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे इतर कामकाजांसोबतच सिनेइंडस्ट्रीचेही कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे याचा फटका मालिका व चित्रपटांना पडला. शूटिंग थांबल्यामुळे मालिकांचे प्रसारण थांबले आणि त्याजागी जुन्या मालिका प्रसारीत होऊ लागल्या. शूटिंग पूर्ण झालेले सिनेमे थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. तर शूटिंग बाकी असलेल्या सिनेमाच्या रिलीज डेट लांबणीवर गेल्या. असेच काहीसे मराठी चित्रपट डार्लिंगच्या बाबतीत झाले आहे.

डार्लिंग चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आले आहे की, कोविड 19मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्ही डार्लिंग या आमच्या आगामी सिनेमाचे प्रदर्शन पुढे नेत आहोत.डार्लिंग यापूर्वी 12 जूनला प्रदर्शित होणार होता. आम्हाला आशा आहे की चित्रपटगृह पुन्हा उघडताच आणि आपण सर्व सुरक्षित असाल तेव्हा आपली भेट होईल.तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. लवकरच भेटू थिएटरमध्ये.

‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या वेगळ्या वाटेनं जाणा-या सिनेमानंतर ‘डार्लिंग’च्या निमित्ताने दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी एका नवा जॉनर हाताळला आहे. मोशन पोस्टर नंतर आता सिनेमातील ‘डार्लिंग’ म्हणजेच अभिनेत्री रितीका श्रोत्रीची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणण्यात आली आहे, परंतु या सिनेमात रितीकाचा नायक कोण असेल ते अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.

 याशिवाय सिनेमातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञांची नावंही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत

टॅग्स :टकाटककोरोना वायरस बातम्या