Join us

करार चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 16:12 IST

आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाºया  लोकांवर टीका करणाºया करार  या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लॉच करण्यात आले आहे.  मनोज ...

आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाºया  लोकांवर टीका करणाºया करार  या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लॉच करण्यात आले आहे.  मनोज कोटियन दिग्दर्शित करार या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाºया  एका करारबद्ध तरुणांची कथा या चित्रपटात मांडली आहे. आयुष्याला केवळ करार म्हणून पाहणाºया या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा, आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येतात. तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार या चित्रपटाचा महत्वाचा सार आहे. करार या चित्रपटाचा ट्रेलर भावनाशुन्य झालेल्या समाजाचे कान पिळणारा ठरत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीतदिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे.या चित्रपटात आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सुहासिनी मुळे आणि आरती मोरे हे कलाकारांचादेखील या चित्रपटात समावेश असणार आहे. तर संजय जगताप लिखित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहेत. करार हा चित्रपट रसिकांना मंत्रमुघ्ध करणारा ठरेल यात शंका नाही. आजच्या धावत्या जगात बदल चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हाचित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.