Join us  

Congratulation:शशांक केतकर दुस-यांदा अडकला विवाहबंधनात,समोर आले लग्नाचे INSIDE PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 9:14 AM

छोट्या पडद्यावरील रसिकांचा लाडका 'श्री' म्हणजेच अभिनेता शशांक केतकर. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील श्री या भूमिकेनं शशांकने ...

छोट्या पडद्यावरील रसिकांचा लाडका 'श्री' म्हणजेच अभिनेता शशांक केतकर. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील श्री या भूमिकेनं शशांकने रसिकांच्या मनावर जादू केली होती.या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला असला तरी शशांकने साकारलेला 'श्री' आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.आता शशांकने त्याच्या सा-या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.ती म्हणजे शशांक केतकर व्यवसायाने वकील असलेल्या प्रियांका ढवळेसोबत विवाहबंधनात अडकला आहे.शशांकचा हा दुसरा विवाह आहे.याच वर्षी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांचा साखरपुडा पार पडला होता.प्रियांकाही शशांकची खास मैत्रिण आहे.अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शशांक आणि प्रियांकाच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत सा-यांना शशांकची गुड न्युज चाहत्यांसह शेअर केली होती.साखरपुडा झाल्यापासून शशांकच्या लग्नाचे काऊंड डाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.शशांकचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने पार पडला.या लग्नसोहळ्याला शशांक आणि प्रियांकाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.या फोटोंमध्ये नववधू प्रियांकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावर शशांकच्या लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.शशांकचे पहिले लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत झाले होते.‘होणार सून ह्या या घरची’मालिकेत श्री ची पत्नीच्या रुपात जान्हवीची व्यक्तिरेखा तेजश्री प्रधानने साकारली होती.श्री आणि जान्हवीची जोडी तुफान लोकप्रिय झाली होती.विशेष म्हणजे,याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्री या दोघांतही रिअल लाईफ प्रेम फुलले होते.यानंतर पडद्यावरील हे नवरा-बायको वास्तवातही एकत्र आले होते.अर्थात त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. एका वर्षात शशांक आणि तेजश्री विभक्त झाले होते.(Also Read:नववधू तेजश्री प्रधान? …..काहीही हं !!! सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो)मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतही सध्या ‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.नुकतेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे दिग्दर्शक अभिषेक जावकरसह रेशीमगाठीत अडकली.तर तिच्या पाठोपाठ अभिनेता विजय आंदळकर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.अभिनेत्री पुजा पुरंदरे हिच्याशी गुरूवारी तो रेशीमगाठीत अडकला.आता यांच्या पाठोपाठ 'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर मैत्रिण अंकिता शिंगवीसह येत्या 11 डिसेंबरला रेशीमगाठीत अडकणार आहे.हा विवाहसोहळा महाबळेश्वर येथे पार पडणार आहे.