Join us

ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांची जमली जोडी टीटीएमएमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 16:23 IST

टीटीएमएम म्हणजेच तुझं तू माझं मी हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री नेहा ...

टीटीएमएम म्हणजेच तुझं तू माझं मी हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री नेहा महाजन यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. आपल्या आयुष्याबद्दल स्वतःची काही मतं असणारे दोन तरुण म्हणजे जय (ललित प्रभाकर) आणि राजश्री (नेहा महाजन) घरच्यांच्या कटकटीपासून पळून जातात आणि एकमेकांना भेटतात. यापुढे त्यांच्यासोबत काय होते आणि त्यांचा एकंदरीत प्रवास म्हणजे टीटीएमएम हा चित्रपट आहे. त्यांच्या या प्रवासातील गडबड-गोंधळ, धमाल-मस्ती, आनंद-दुःख हे सर्व प्रेक्षक चित्रपटातून अनुभवू शकणार आहेत. ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, सागर कारंडे, विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतीश पुळेकर, सीमा देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.ललित प्रभाकर आणि नेहा महाजन ही जोडी मोठ्या पडद्यावर ‘टीटीएमएम म्हणजेच तुझं तू माझं या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिसणार आहे आणि त्यांची मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून कुलदीप जाधव या तरुण दिग्दर्शकाने टीटीएमएम चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटाला संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत टीटीएमएम चित्रपटाची निर्मिती डॉ. संतोष सावंत यांनी केली आहे.