Join us

चिराग पाटीलची मालदीव भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 15:06 IST

चंदेरी दुनियेविषयी प्रत्येक व्यक्तीला आकर्षण असते. या झगमगत्या दुनियेत काय चालले आहे याच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे ...

चंदेरी दुनियेविषयी प्रत्येक व्यक्तीला आकर्षण असते. या झगमगत्या दुनियेत काय चालले आहे याच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे कोणाचे लग्न वगैरे असेल तर त्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता  अधिक वाढते. आता हेच पाहा ना, सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सनई चौघडे वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्ट्रीतील अभिनेता गौरव घाटणेकर - श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे- स्वप्नील राव यांच्या विवाह यादीत अभिनेता चिराग पाटील याचाही समावेश आहे. चिराग हा १ डिसेंबररोजी सना अंकोला हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. लग्नानंतर बरेच कलाकार फिरण्यासाठी परदेशवारीची निवड करत असतात. आता चिरागनेदेखील मालदीवची निवड केली आहे. चिराग आणि सना ही जोडीदेखील मालदीवच्या निसर्गरम्य वातावरणात रमली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच चिरागने मालदीवच्या मार्गावर असल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. कदाचित चिरागने हनीमूनसाठी मालदीवची निवड केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तो मालदीवच्या समुद्राची ट्रीप एन्जॉय करताना दिसत आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. एन्जॉ़य द ट्रीप असे ही कमेंन्ट करताना त्याचे चाहते पाहायला मिळत आहे. सना ही चिरागची बालपणीची मैत्रिण आहे. चिरागचा नुकताच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री सई ताम्हणकरच्या पतीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच तो एक नंबर या मालिकेतदेखील झळकला होता. त्याचप्रमाणे चिरागने अनेक मराठी व बॉलिवुड चित्रपटदेखील केले आहेत. त्याची दुसरी ओळख म्हणजे चिराग हा क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आहे.