Join us

​चिराग पाटील झळकणार दिल दोस्ती दिवानगी या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 10:35 IST

चिराग पाटीलने गुरूपौर्णिमा, भारतीय, चार्जशीट यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. चित्रपटांमध्ये यश ...

चिराग पाटीलने गुरूपौर्णिमा, भारतीय, चार्जशीट यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. चित्रपटांमध्ये यश मिळाल्यानंतर चिराग छोट्या पडद्याकडे वळला. त्याने येक नंबर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या त्याच्या मालिकेलादेखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चिराग नव्या चित्रपटात अथवा मालिकेत कधी झळकणार याची त्याचे फॅन्स नेहमीच वाट पाहात असतात. चिरागच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याने नुकतीच त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. तो आता एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे नाव दिल दोस्ती दिवानगी असे आहे. चिरागने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने एक ट्वीट करून त्यात म्हटले आहे की, मी माझ्या नव्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट लवकरच येत असून या चित्रपटाचे नाव दिल दोस्ती दिवानगी असे आहे. चिरागची या चित्रपटात भूमिका काय असणार आहे, या चित्रपटाची कथा काय आहे तसेच या चित्रपटात त्याच्यासोबत सहकलाकार कोण असणार आहेत याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. पण हे ट्वीट करताना त्याने अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि अभिनेत्री वीणा जगताप यांना टॅग केले आहे. त्यावरून या दोघी या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे तर्क लावले जात आहेत. चिराग पाटील हा प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आहे. आता त्याने त्याच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.Also Read : चिराग पाटील बनला पत्नी सनासाठी गीतकार आणि गायक