Join us

‘चक दे गर्ल’ विद्या माळवदेचा मराठमोळा अंदाज, रमा नावाची साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 13:21 IST

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुखचा 'चक दे इंडिया' हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच. या सिनेमात शाहरुखने ...

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुखचा 'चक दे इंडिया' हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच. या सिनेमात शाहरुखने साकारलेला महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक कबीर खान साऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरला.या सिनेमात महिला हॉकी संघाला जेतेपद मिळवून देण्यात कबीर खान कशारितीने यशस्वी ठरतो हे दाखवण्यात आलं होतं. याच महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवलं होतं अभिनेत्री विद्या माळवदे हिने. सिनेमाच्या क्लायमेक्समध्ये निर्णायक क्षणी विद्या भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावते असं दाखवण्यात आलं होतं. मराठमोळी अभिनेत्री असलेल्या विद्यावर या भूमिकेनंतर कौतुकाचा वर्षाव झाला होता. 'चक दे' सिनेमाच्या यशानंतर विद्याने मॉडेलिंग आणि हिंदीत काम सुरु ठेवलं.मात्र मराठी सिनेमा किंवा मालिका तसंच नाटकात ती झळकली नाही. त्यातच मराठीत काम करण्याची तिची इच्छा नसल्याचे ऐकायला मिळाल्याने मराठी रसिक आणि तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र आता विद्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. विद्या लवकरच एक मराठी व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. रमा नावाची तिची ही व्यक्तीरेखा असणार आहे. छोट्या पडद्याची क्वीन एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सशी संबंधित आगामी प्रोजेक्टमध्ये विद्या झळकणार आहे. विद्याने आपल्या मराठमोळ्या अंदाजातला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यातील विद्याचा मराठमोळा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असा आहे. काहीतरी वेगळे करत आहे अशी टॅगलाईन देत सेटवरील हा व्हिडीओ विद्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.आता विद्या साकारत असलेली रमा ही व्यक्तीरेखा हिंदी सिनेमातील आहे की मराठी सिनेमातील किंवा मालिकेतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  'चक दे' सिनेमात कबीर खानला  पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे त्याला भारतीय हॉकी संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वषार्नंतर हरवलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी तो वादग्रस्त भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. वादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ या वाटचालीमध्ये खान गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवतो. त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करणारे लोक पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात, अशी या चित्रपटाची कथा सगळ्यांचा मनाला भावली होती.यातील शाहरूखच्या हॉकी टीमनेही सगळ्यांची मने जिंकली होती. अनेक नवे चेहरे या टीममध्ये दिसले होते. १० वर्षांनंतर या टीममधील हे चेहरे आज कुठे आहेत, जाणून घेऊयात...