Join us  

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार टिव्हीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 8:00 PM

माधुरी दिक्षित या हास्यसम्राज्ञीचा पहिलावहिला मराठी चित्रपट,धर्मा प्रोडक्शन्सचं मराठी चित्रपटासृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल, रणबीर कपूरची मराठी चित्रपटात दिसलेली पहिली झलक तर प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल्ल झालेला पहिला मराठी सिनेमा...

ठळक मुद्दे‘बकेट लिस्ट’ आता पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एंट्री मारणार आहे ते म्हणजे ‘सोनी मराठी’च्या माध्यमातून… या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या 16 डिसेंबरला सोनी मराठीवर पाहता येणार आहे.आपल्या धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीचा जादुई मंत्रा महाराष्ट्राची धकधक गर्ल माधुरी, ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी घेऊन आली होती.

माधुरी दीक्षित... प्रत्येक मराठी माणसाला भावणारं हास्य... कित्येक वर्ष आपल्या अदांनी जगभरातील चाहत्यांना घायाळ करणारी ही माधुरी कधीतरी आपल्या मराठी चित्रपटात झळकावी, ही प्रत्येक मराठी मनाची इच्छा... आपल्या चाहत्यांचं मन ओळखून या हास्यसम्राज्ञीने गेल्या संक्रातीला गोड बातमी दिली आणि ती म्हणजे आपल्या मराठी चित्रपटाची... हा चित्रपट म्हणजे... ‘बकेट लिस्ट’

माधुरी दिक्षित या हास्यसम्राज्ञीचा पहिलावहिला मराठी चित्रपट,धर्मा प्रोडक्शन्सचं मराठी चित्रपटासृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल, रणबीर कपूरची मराठी चित्रपटात दिसलेली पहिली झलक तर प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल्ल झालेला पहिला मराठी सिनेमा... या आणि अशा कित्येक विशेषणांनी समृद्ध ‘बकेट लिस्ट’ आता पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एंट्री मारणार आहे ते म्हणजे ‘सोनी मराठी’च्या माध्यमातून… या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या 16 डिसेंबरला सोनी मराठीवर पाहता येणार आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीचा जादुई मंत्रा महाराष्ट्राची धकधक गर्ल माधुरी, ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी घेऊन आली होती. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींची एक यादी केली तर त्या पूर्ण करणं सोपं जातं. या छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद खूप मोठा असतो, ज्याने आयुष्य समृद्ध होतं जातं... हा संदेश देणारी बकेट लिस्ट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. जगण्याची भाषा बदलून आपलं आयुष्य जगताना, आपल्या आनंदाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही गोष्ट दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी या चित्रपटातून अगदी अचूक मांडली आहे.

विनोदाची झालर असणाऱ्या या चित्रपटात माधुरीबरोबरच सुमित राघवन, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, प्रदिप वेलणकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, शुभा खोटे आणि रेशम टिपणीस या कलाकारांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. या सगळ्यांच्याच अभिनयाची ही गोड-तिखट मिसळ तुम्ही नव्याने अनुभवू शकणार आहात सोनी मराठीवर. या चित्रपटात माधुरीचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्यामुळे माधुरीच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पुन्हा एकदा पाहाणे ही पर्वणीच असणार आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षित