Join us

समुद्रकिनारी नेहाचा ब्रेकटाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:51 IST

कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी ...

कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात. आता हेच पाहा ना, अभिनेत्री नेहा महाजन सध्या तिच्या मराठी,मल्याळी आणि कॅनेडियन अशा कितीतरी भाषांमधील चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. पण नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. हा फोटो तिने खास स्वत:साठी मिळालेल्या ब्रेकटाईममध्ये काढला असल्याचे सांगितले आहे. हा फोटो तिने नुकताच ट्विटरवर अपलोड केला आहे. इन द सनशाईन विथ द वाईन्ड अशी कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. मुंबईमधील समुद्रकिनारी हा फोटो काढल्याचे दिसते आहे. नेहाच्या या कुल फोटोला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळत आहेत.