Join us

भय चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडचे आवाज मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 11:22 IST

मराठी  चित्रपटांमध्ये बॉलीवूडच्या गायकांचा आवाज असणं आता नवं नाही. पण ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित आगामी ...

मराठी  चित्रपटांमध्ये बॉलीवूडच्या गायकांचा आवाज असणं आता नवं नाही. पण ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित आगामी भय या मराठी चित्रपटातील गीतांसाठी मात्र बॉलीवूडमधील गीतकार, संगीतकार, गायक पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या सर्व मंडळीचं एका मराठी सिनेमासाठी एकत्र येणं हे भय चित्रपटाच्या संगीताच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. राहुल भातणकर दिग्दर्शित भय हा सिनेमा १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. रॉकी हँडसम, इश्क क्लिक यासारखे अनेक चित्रपट, मालिका व अल्बमसाठी गीते लिहिणाºया गीतकार शेखर अस्तित्व यांनीही भय चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गीतलेखन केले आहे. हिंदीतले संगीतकार विक्रम माँटरोज यांचा संगीतसाज ही फक्कड जमला आहे. गाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी,अ‍ॅड्स जिंगल्स तसेच अनेक मालिकांमधील अभिनेत्री-गायिका तुलिका उपाध्याय व तनू वेड्स मनू, जय हो यासारख्या हिंदी चित्रपटांचे गायक ब्रिजेश शांडिल्य यांनी साजणा, मी आलो, या भय चित्रपटातील दोन गीतांना स्वरसाज दिला आहे. सुफी आणि गझल गायकीत माहिर असलेल्या अली असलम यांनी चिनार दास्ताने इश्क, भेंडी बझार यासारख्या अनेक चित्रपटांमधून व वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. भय चित्रपटातील चल रे हे भावपूर्ण गीत अली असलम यांनी गायलं आहे. आपल्या या नव्या अनुभवाबद्दल बोलताना उत्सुक असलेली ही सारी मंडळी सांगतात की, ही गाणी गाताना खूपच मजा आली. शब्दांचा उच्चार, गाण्यांचा मूड समजून घेऊन आम्ही ही गाणी गायली आहेत. चित्रपटाच पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर याचं आहे. भय ची ध्वनीफित झी म्युझिकने प्रकाशित केली आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना १६ डिसेंबरपर्यत वाट पाहावी लागणार आहे.