Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोल्ड दीप्तीनं साडीतील सिम्पल पण सोज्वळ सौंदर्यानं सर्वांना पाडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:43 IST

दीप्ती सतीने साडीतील फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड  व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. परंतु यावेळेस ती ट्रेडिशनल लूकमुळे चर्चेत आली आहे.

दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून सोशल मीडियावर तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. मात्र नुकताच तिने साडीतील फोटो शेअर केला आहे. यात ती खूपच सोज्वळ दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिनं म्हटलं की, गरमीमध्ये कम्फर्ट असलेली कॉटन साडी नेसली आहे. 

दीप्ती सतीने या फोटोत तिने कॉटनची ब्लॅक व ग्रीन रंगाची साडी नेसली आहे व एकदम सिम्पल लूकमध्ये देखील ती खूप गोड दिसते आहे. तिच्या या फोटोला खूप चांगली दाद मिळते आहे.

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सतीसोबत अभय महाजन मुख्य भूमिकेत होता. 

टॅग्स :संजय जाधव