भारत गणेशपूरे झाले मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 15:40 IST
अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची छाप पाडलेले भारत गणेशपूरे आता मंत्री झाले आहेत. चकित होऊ नका.. रंगा पतंगा या चित्रपटात ...
भारत गणेशपूरे झाले मंत्री
अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची छाप पाडलेले भारत गणेशपूरे आता मंत्री झाले आहेत. चकित होऊ नका.. रंगा पतंगा या चित्रपटात त्यांनी मंत्र्याची भूमिका साकारली आहे. विदर्भातील एका पालकमंत्र्याच्या छोट्या; पण महत्त्वाच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. अस्सल वैदर्भीय बोलीत त्यांनी या भूमिकेत रंग भरले आहेत. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर रंगा पतंगामध्ये त्यांचा बेरकी राजकारणी भाव खाऊन जाईल. जुम्मन या मुस्लिम शेतकऱ्याचे बैल चोरीला गेल्याची बातमी कळल्यानंतर त्यामागील राजकारणाचा विचार करून हा पालकमंत्री तपास यंत्रणांना कसं कामाला लावतो, या पहायला मिळणार आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित 'रंगा पतंगा' १ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.