Join us  

​भरत जाधव यांनी झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 10:25 AM

रंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाट्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारे आणि त्याचे कौतुक ...

रंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाट्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारे आणि त्याचे कौतुक करणारे प्रतिष्ठित आणि मोलाचे व्यासपीठ म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा. हा सोहळा काही दिग्गज कलाकार आणि रंगकर्मी यांच्या उपस्थितीत पार पडला. बहारदार परफॉर्मन्सेस आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात रंगकर्मींनी अनेक पुरस्कार पटकावले. यंदा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.नाटक क्षेत्रातील हुकमी एक्का असलेला अभिनेता भरत जाधव यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. वेलकम जिंदगी मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौम्या जोशी लिखित वेलकम जिंदगी हे नाटक एका चैतन्यशील वृद्ध माणसावर आधारित आहे ज्याला खूप जगायचंय आणि एका ११८ वर्ष जगलेल्या चायनीज गृहस्थाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे.सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार पटकावल्यानंतर भरत जाधव आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले, "मी सर्वप्रथम या नाटकाचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि निर्माते शेखर ताम्हाणे यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला या नाटकात कास्ट केलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला. वय वर्ष ७५ असलेल्या इसमाची भूमिका साकारणं खूप आव्हानात्मक आहे पण वेळोवेळी प्रेक्षकांनी देखील आमच्यावर आणि आमच्या कामावर प्रेमाचा वर्षाव केला. हा पुरस्कार वेलकम झिंदगीच्या संपूर्ण टीमचा आहे, सगळ्यांची मेहनत आणि कष्ट यामागे आहेत."