थेसपो नाटयस्पर्धेत भंवरची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:36 IST
पृथ्वी थिएटर येथे रंगलेल्या थेसपो राष्ट्रीय नाटय स्पर्धेमध्ये भंवर या नाटकाने बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ८० नाटक आले ...
थेसपो नाटयस्पर्धेत भंवरची बाजी
पृथ्वी थिएटर येथे रंगलेल्या थेसपो राष्ट्रीय नाटय स्पर्धेमध्ये भंवर या नाटकाने बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ८० नाटक आले होते. या नाटकांमधून पाच नाटकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विराजस कुलकर्णी दिग्दर्शित भंवर या हिंदी नाटकाचा समावेश असून या नाटकाला पाच पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकाच्या यशाविषयी विराजस लोकमत सीएनएक्सला सांगतो, भंवर हे हिंदी नाटक आहे. हे नाटक एकपात्री असून शिवराज वायचाळ आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना रंगभूमीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या राष्ट्रीय पातळीवरच्या नाटकाला पाच पुरस्कार मिळाल्याने खरचं खूप आनंद झाला आहे. ज्या पृथ्वी थिएटरमध्ये मोठमोठे कलाकार आपला अभिनय सादर करत असतात. अशा ठिकाणी मला काम करण्यास मिळाले याचादेखील अधिक आनंद होत आहे. तसेच या स्पर्धेमध्ये बंगाली,गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये नाटक करण्यात आले आहे. या सर्व नाटकांसोबत आपले नाटक सादर करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहेच. त्याचबरोबर देशभरातून आलेले दिग्दर्शक, लेखक, कलाकार या सर्वाना भेटतादेखील आले. या स्पर्धेचा अनुभव खरचं खूप छान होता. या नाटकामध्ये भंवरसिंग एका मोकळया फॅक्टरीच्या बाहेर काम करणारा चौकीदार आहे. त्याच जग फक्त रात्री आस्तित्वात असतं. आपण अशिक्षित असल्याचा न्यूनगंड मनात बाळगणाºया भंवरला राखण करताना मात्र कधीच न झोपता आपण कामाशी एकनिष्ठ राहिल्याचा अभिमान आहे. पण आता त्याने नोकरी सोडून आयुष्यात प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही कारणाने त्याचा काम सोडण्याच्या आधी शेवटचा पहारा लांब जातो आणि न झोपता काम केल्याने भंवरला पहिल्यांदाच आपल्या एकतेपणाशी आणि स्वत:शी झुंजावं लागत. म्हणजेच थोडक्यात एकांतात मानवी मनाचं काय होतं? अशा गंभीर विषयाला गंमतीशीर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. .