Join us  

भाग्यश्री मोटेच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 7:15 AM

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते.

ठळक मुद्दे भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहे.  भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.

काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाग्यश्री गाऊन घातला आहे. तळ्याच्या काठावर बसून तिने हा फोटो काढला आहे. तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे. 

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती  'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

याशिवाय भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.

टॅग्स :भाग्यश्री मोटे