Join us

नाटकातही ऐकू येणार 'बीप-बीप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:43 IST

बीप..बीप.. तुम्हाला वाटेल काही आक्षेपार्ह किंवा अश्लील शब्द वगैरे वापरले जातायत की काय? पण तसं नाहीये. तर गोष्ट अशी ...

बीप..बीप.. तुम्हाला वाटेल काही आक्षेपार्ह किंवा अश्लील शब्द वगैरे वापरले जातायत की काय? पण तसं नाहीये. तर गोष्ट अशी आहे, की इतकी वर्षे बीप-बीप हा आवाज तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ऐकला असेल.. आक्षेपार्ह शब्दांसाठी. पण, आता हा आवाज तुम्हाला नाटकातही ऐकायला मिळणार आहे. वाटली ना उत्सुकता; पण जरा थांबा. कारण हा प्रयोग सध्या तरी एकाचा नाटकामध्ये केला जाणार आहे.या नाटकाद्वारे रंगभूमीवर बीप-बीप हा आवाज ऐकू येईल. या नवीन प्रयोगाबद्दल अभिनेते व मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे सांगतात, 'सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर 'बीप'ला मान्यता देण्यात आली आहे. ही कल्पना जरा चांगली वाटली. त्यापेक्षाही अधिक म्हणजे नवीन कल्पनांचा विचार केला गेला पाहिजे. कारण अश्लील शब्द वाक्यातून संपूर्णपणे गाळलेच गेले, तर त्या वाक्यातील अर्थच निघून जातो. यामुळे प्रेक्षक आणि खास करून लहान मुलांच्या कानावर असे शब्द पडत नाहीत आणि वाक्याचा नेमका अर्थ, त्यातील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे एक संधी द्यायला काहीच हरकत नाही, असे वाटले. हा प्रयोग यशस्वी झाला, तर त्याबद्दल निश्‍चितच विचार केला जाईल. त्यामुळे आता कथेची गरज म्हणून नाटककार मंडळींनादेखील आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणारं.. पण 'बीप-बीप'मधून!