Join us

सवाई गंधर्वला प्रेक्षकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 12:32 IST

 आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शनिवारी दुपारपासूनच रसिकांची गर्दी होऊ लागली होती. जयपूर ...

 आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शनिवारी दुपारपासूनच रसिकांची गर्दी होऊ लागली होती. जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या धनाश्री घैसास यांच्या गायनाने महोत्सवातील चौथ्या सत्राची सुरुवात झाली. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांच्या गायनाची मैफील झाली. लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूंच्या सतार आणि सरोदवादनानंतर डागर घराण्याचे पं. उदय भवाळकर यांचे धृपदगायन झाले. कर्नाटक संगीतातील डॉ. एल. सुब्रमण्यम आणि अंबी सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन सहवादनाने शनिवारच्या सत्राची सांगता झाली. गायन-वादनाला मिळणारी उत्स्फूर्त दाद.. कलाकार समेवर येताच डोलणाºया माना.. गाणं ऐकून झाल्यावर मंडपामागच्या स्टॉलवरचं खाणं.. विविध स्टॉल्सवर शास्त्रीय संगीताच्या सीडींची केलेली खरेदी.. अशा उत्साही वातावरणात शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शनिवारी रसिकांच्या अलोट गदीर्ने रंग भरला. रसिकांच्या उपस्थितीने मंडप खचाखच भरला होता. या महोत्सवातील ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी गेल्या १८ वर्षांपासून स्वरांजलीचे प्रदीप माळी सांभाळत आहेत. १८ वर्षांपूर्वी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे सत्र संपल्यानंतर पंडितजींनी पाठीवर शाबासकी दिली आणि जिंकलंस एवढेच म्हणाले. माज्यासाठी तो मोठा आशीर्वाद होता, ही आठवण सांगताना माळी यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. गायन, तालवाद्य आणि तारवाद्य अशा सर्व प्रकारांसाठी ध्वनीची वेगळी तयारी करावी लागते. मैफील सुरू होण्यापूर्वी ग्रीन रुममध्ये जाऊन मी वाद्याची जातकुळी आणि नाद याचा अभ्यास करून त्यानुसार ध्वनिव्यवस्था करतो. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी ८० हजार चौरस फूट भव्य मंडप हा अभिजात संगीत मैफिलीसाठी जगातील एकमेव मंडप गोखले मांडववाले यांनी उभारला आहे. अवघ्या १२ दिवसांत ७० कामगारांनी हा मंडप उभारला असून त्यासाठी ६ हजार बांबू, ६०० वासे, ५० टन लोखंडी माल , ७०० प्लायवूड, १० हजार मीटर कापड एवढे साहित्य लागले आहे.