Join us  

लॉकडाउनमध्ये असा पार पडला अरूण गवळीची लेक योगिता व अभिनेता अक्षय वाघमारेचा विवाह सोहळा, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 6:25 PM

योगिता व अक्षय वाघमारे यांच्या लग्नाचे फोटो आले समोर

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे यांचा साधेपणात विवाह पार पडला. दगडी चाळीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या लग्नातील फोटो समोर आला आहे. या फोटोत अरूण गवळी व त्यांची पत्नी मुलगी व जावईला आशीर्वाद देताना दिसत आहेत.

योगिता आणि अक्षयचा विवाहसोहळा हा अतिशय साधेपद्धतीने करण्यात आला. डिसेंबरमध्ये साखरपुडा झालेल्या या दोघांच लग्न २९ मार्च रोजी मुंबईतील लोअर परेल परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात आले.

अक्षय आणि योगिता यांचा हळदी समारंभ व मेहंदीचा कार्यक्रम काल कमी लोकांमध्ये दगडी चाळीतच पार पडला आहे.अक्षय लग्नासाठी पुण्यातून पोलिसांची परवानगी घेऊन मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे त्याने हाताला मेहंदी लावल्याचा फोटो शेअर करत पुणे व मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

तसेच त्याने त्याच्या भावी पत्नी योगिता सोबतचा हळदी सेरेमनीचा फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अक्षय वाघमारे मराठी सिनेमात काम करत असून योगिता पेश्याने वकिल असून एक संस्था चालवते. काही वर्षांपासून योगिता आणि अक्षय एकमेकांना ओळखत असून अक्षय आणि महेश योगिताचा भाऊ हे दोघे खूप चांगल मित्र आहेत.

टॅग्स :अरुण गवळी