Join us

विक्रमच्या आयुष्यात नन्ही परीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:02 IST

काहीवेळा प्रेक्षकांना मालिकांचा आणि त्यातील कलाकारांचा विसर पडतो. मात्र 'उंच माझा झोका' ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षक या ...

काहीवेळा प्रेक्षकांना मालिकांचा आणि त्यातील कलाकारांचा विसर पडतो. मात्र 'उंच माझा झोका' ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षक या मालिकेला ना विसरले ना कधी विसरु शकतात. फक्त मालिकाच नव्हे तर 'महादेव गोविंद रानडे' यांची भूमिका साकारणारा विक्रम गायकवाडचा अभिनय अजूनही आठवतो.

'डॉ. प्रकाश बाबा आमटे- दि रिअल हिरो' या चित्रपटात विक्रमने काम केले होते आणि 'झुंज मराठमोठी' या रिएलिटी शोचा विजेता पण ठरला होता. आपला हा बिनधास्त, लाडका अभिनेता बाबा झाला आहे. विक्रमच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. विक्रमला मुलगी झाल्याने त्याच्या घरी आनंदाचं वातावरण नक्कीच असेल आणि त्याचे फॅन्स पण ही गोड बातमी ऐकून आनंदीत होतील.

या गोड बातमीचा खुलासा विक्रमने  सोशल नेटवर्किंग साईटवर केला आहे.