Join us  

'मी पण सचिन' मध्ये 'ही' अभिनेत्री साकारतेय प्रशिक्षकची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 8:00 AM

अतिशय हुशार आणि प्रतिभावान असलेली देविका एका परिस्थितीमुळे तिच्या मोठ्या क्रिकेट खेळाडू होण्याच्या स्वप्नाला मागे सारत क्रिकेटची प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करते.

ठळक मुद्दे देविका वैद्य नावाची भूमिका अनुजा साकारत आहेक्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका निभावताना अनुजाला क्रिकेट येणे आवश्यक होते

अनुजा साठे-गोखले लवकरच बहूप्रतिक्षीत आणि बहूचर्चित 'मी पण सचिन' या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. खूप दिवसांनी अनुजा चित्रपटात दिसणार आहे.  देविका वैद्य नावाची भूमिका अनुजा साकारत आहे. ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन आहे. अतिशय हुशार आणि प्रतिभावान असलेली देविका एका परिस्थितीमुळे तिच्या मोठ्या क्रिकेट खेळाडू होण्याच्या स्वप्नाला मागे सारत क्रिकेटची प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करते. आपल्या देशात खूप हुशार, चांगले खेळाडू आहेत पण फक्त काही गोष्टीमुळे ते खेळाडू  पुढे येऊ शकत नाही. असा देविकाचा ठाम विचार असतो. अशी ही देविका आणि स्वप्नीलची यांची चित्रपटमध्ये एका वळणावर भेट होते. त्यानंतर पुढे काय होते हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर समजेल. क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका निभावताना अनुजाला क्रिकेट येणे आवश्यक होते. यापूर्वी तिने एका मालिकेसाठी क्रिकेट खेळाडूची भूमिका साकारली होती त्यामुळे तिला तसा हा खेळ नवीन नव्हता. पण, तिला क्रिकेटच्या सरावाची खूप गरज होती. त्यासाठी तिने क्रिकेटचा सराव सुरू केला आणि ही भूमिका उत्तम बजावली. अनुजा तिच्या या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगते की, " मला चित्रपटाबद्दल जेव्हा विचारणा झाली तेव्हा हा चित्रपट मी करणार हे मी पक्के ठरवले. कारण मला ही भूमिका वेगळी आणि आव्हानात्मक वाटली. जरी माझ्या एका मालिकेमुळे मला क्रिकेट बद्दल माहिती होती आणि क्रिकेट खेळता पण येत होता. तरीपण मधल्या काही काळात क्रिकेट खेळण्याशी माझा संबंध आला नाही. त्यामुळे सराव जोरदार करावा लागणार होता. आणि हा सराव माझ्याकडून श्रेयशने करून घेतला. आपल्या खेळावर प्रेम करणारी, खेळाबद्दल भावनिक असणारी अशी ही देविका रंगवताना मला मजा आली." 

 मी पण सचिन'  चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. एका ध्येयाने झपाटलेल्या तरुण खेळाडूची आशादायी कथा या सिनेमात रेखाटण्यात आली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. आता सर्व  सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन श्रेयश जाधव यांनी केले आहे. 'मी पण सचिन' या चित्रपटाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावर देखील वितरण करणार आहे.

टॅग्स :अनुजा साठेस्वप्निल जोशीश्रेयश जाधवमी पण सचिन