Join us  

अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण पहिल्यांदाच झळकणार ह्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 12:53 PM

नुकतीच सोशल मीडियावरून अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव यांची कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाली आहेत. ह्याशिवाय अजून कोण ह्या सिनेमात आहेत, याविषयी सध्या उत्सुकता आहे.

ठळक मुद्देस्नेहा व अनिकेतची गोव्यात चित्रीकरणादरम्यान झाली मैत्री 'हृदयात समथिंग समथिंग' कौटुंबिक सिनेमा

अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा नुकताच पुण्यात साखरपुडा पार पडला. आता लवकरच हे दोघेे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'हृदयात समथिंग समथिंग'. 

स्नेहा चव्हाणला अनिकेतविषयी विचारल्यावर ती म्हणते, 'मी अनिकेतला 'हृदयात समथिंग समथिंग'च्या चित्रीकरणावेळी पहिल्यांदा भेटले. आमच्या सिनेमाचं आळंदी, पूणे, मुंबई आणि गोव्याला चित्रीकरण झाले आहे. गोव्यातल्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री झाली. हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.'अनिकेत विश्वासराव सांगतो, 'स्नेहाला भेटायच्या अगोदर मी तिचे नाटक किंवा सिनेमातले काम पाहिले नव्हते. पण ती मेहनती, प्रामाणिक आणि प्रतिभावान अभिनेत्री असल्याचे तिच्यासोबत काम करताना मला जाणवले. गोव्याच्या चित्रीकरणादरम्यान मला आयुष्यभरासाठीची मैत्रीण मिळाली.'बॉन्डिंग नक्की कशी झाली असे विचारल्यावर अनिकेत म्हणाला की, 'आम्ही दोघेही खव्वय्ये आहोत. ही गोष्ट सोडल्यास बाकी आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. मी अंतर्मुख आहे. तर ती खूप मिळून-मिसळून राहणारी, उत्साही, मस्तीखोर, साहसी मुलगी आहे.'नुकतीच सोशल मीडियावरून अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव यांची कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाली आहेत. ह्याशिवाय अजून कोण ह्या सिनेमात आहेत, याविषयी सध्या उत्सुकता आहे.दिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी सांगतात, 'हा धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे. अनिल कालेलकर ह्यांनी लिहीलेल्या संवादांमूळे तुम्ही चित्रपटभर सतत हसत राहाल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. ब-याच कालावधीत मराठी फिल्म इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. चित्रपट प्रेमाविषयी असला तरीही कुटूंबातल्या 90 वर्षांच्या आजीपासून ते 9 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे.'पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित व अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव ह्यांच्या अभिनयाने सजलेला  'हृदयात समथिंग समथिंग' चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अनिकेत विश्वासरावस्नेहा चव्हाण